जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहन

 

अपॉइंटमेंटशिवाय १८ वर्षावरील वयोगटाचे लसीकरणाबाबत।कोणत्याही सूचना नाहीत

 

बीड | वार्ताहर

 

 

बीड जिल्ह्यात सध्या ४५ वर्षे वय व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्रावर विनाकारण जास्त गर्दी होऊ नये व लसीकरण प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी नागरिकांना  http://ezee.live/Beed-Covid19-Registration या लिंकवर नोंदणी करून टोकन नंबर प्राप्त करून घ्यावा व लसीकरणाला येण्याबद्दल मेसेज अथवा व्हाट्सएप संदेश आल्यावरच लसीकरण करण्यासाठी यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधकिशन पवार यांनी केले.

 

 याबाबत माहिती देताना ते म्हणाले, बीड जिल्ह्यात

सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण  राज्य शासनाच्या सूचनेनुसार स्थगित करण्यात आलेले आहे. या वयोगटातील व्यक्तींचे अपॉइंटमेंट  शिवाय लसीकरण होणार असल्याबाबत बातम्या व्हायरल झालेल्या आहेत परंतु याबाबत राज्य शासन अथवा केंद्र शासनाकडून अधिकृत मार्गदर्शक सुचना अद्याप प्राप्त नाहीत असेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.