शिरूर कासार । वार्ताहर
शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर मुलींच्या शासकीय वसतिगृहात शासकीय कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी दाखल केलेल्या कोरोनाचे सौम्य लक्षणे असणार्‍या 22 रुग्णांनी पळ काढला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचे सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांसाठी शासकीय वसतिगृहात उपचार केले जातात मात्र गेल्या तीन दिवसात या कोव्हिड सेंटरमधून तब्बल 22 रुग्णांनी धूम ठोकली. दरम्यान या रुग्णांमुळे इतर नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ नये व कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ नये म्हणून या सेंटरचे व्यवस्थापक डॉ.राठोड यांनी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे.याविषयी पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पळून गेलेल्या कोरोना रुग्णांविषयी आमच्याकडे आरोग्य विभागाचे पत्र आले आहे तरी या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

डिस्चार्ज होणार असतानाही काढला पळ

पळून गेलेल्या 22 रुग्णांमध्ये काही रुग्णांचे डिस्चार्ज करण्यात येणार होते परंतु या रुग्णांनी कसल्याही प्रकारे सहकार्य न करता कोव्हिड सेंटर मधून पळ काढला आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे, अशी माहिती कोव्हिड केअर सेंटरचे व्यवस्थापक डॉ.विजय राठोड यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.