लसीकरण पूर्ण करा,मुलांना फ्लू लस द्या

डॉ अनुराग पांगरीकर बालरोग तज्ञ ,बीड

सध्या सर्व माध्यमांवर कोरोना च्या तिसऱ्या लाटे विषयी चर्चा आहे आणि मुख्यत्वेकरून ही लाट लहान मुलांना त्रास देईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे बरेचसे पालक घाबरून गेले आहेत त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी ही माहिती .
कोरोना ची तिसरी लाट मुलांमध्ये जास्त त्रास देईल असं म्हणणाऱ्यांमध्ये असा विचार आहे की पहिल्या लाटेमध्ये मुख्यत्वे वृद्ध व ज्यांना काही आजार आहे त्यांच्यामध्ये हा आजार दिसला. सध्या दुसऱ्या लाटेमध्ये 30 ते 45 वर्षाच्या बऱ्याच लोकांना हा आजार दिसला. त्यामुळे हे जास्त वयोगटाच्या लोकांमध्ये सिम्प्टोमॅटिक अथवा असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन होऊन प्रतिकार शक्ती म्हणजेच अँटीबॉडीज तयार झाल्या असतील.या वयोगटाततील बऱ्याच लोकांना लस मिळाल्यामुळे त्यांच्या अंगात कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार झाली असेल. 

त्यामुळे तिसरी लाट जर आली तर या 30 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये व मुलांमध्ये इन्फेक्शन जास्त होईल ,असा विचार बऱ्याच लोकांनी केला आहे .परंतु बाल रोग तज्ञ म्हणून पाहताना ज्या- ज्या कुटुंबांमध्ये मोठ्यांना कोरोना झाला त्या कुटुंबातील लहान मुलांमध्ये सुद्धा हे इन्फेक्शन झालेले आढळून आले आहे
डिसेंबर 20 व जानेवारी 21 मध्ये झालेल्या सिरो सर्वे मध्ये मोठी माणसं व मुलं हे बरोबरीनेच जवळपास 25 टक्के एवढे अँटीबॉडी तयार झालेले दिसली आहे. म्हणजे तिसरी लाट जरी आली तरी लहान मुले व मोठी माणसे बरोबरीनेच इनफेक्ट होण्याचीच शक्यता जास्त वाटते.त्यामुळे फक्त लहान मुलांना होईल हा कयास योग्य वाटत नाही.
लहान मुलांमध्ये आत्तापर्यंत कोरोना चे  जे इन्फेक्शन दिसले आहे, त्यामध्ये जवळजवळ 90- 95 टक्के हे माइल्ड स्वरूपात असतात , पाच ते दहा टक्के हे मध्यम व तीव्र  स्वरूपाचे असू शकतात व एक ते दोन टक्क्यांमध्ये तीव्र कोरोना अथवा एम.आय. एस. सी.  (मल्टी सिस्टेमिक इनफ्लामेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन) हा लहान मुलांमध्ये दिसणारा प्रकार दिसतो .त्यामुळे तिसऱ्या लाटे मध्ये लहान मुलांना जरी इन्फेक्शन झाले तरीही त्यामध्ये असिम्प्टोमॅटिक अथवा माईल्ड सिम्प्टोमॅटिक( सौम्य लक्षणे )  असणार्‍या आजाराचे प्रमाण जास्त असणे अपेक्षित आहे. साधारण पाच ते सात टक्के मुलांना ॲडमिट करण्याची गरज पडू शकते व एक ते दोन टक्के मुलांना सिरीयस आजार अथवा MIS-C होऊ शकेल .त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्स तयार करून अशा प्रकारच्या उपाययोजना शासनाने करण्यास सुरुवात केली आहे. बालरोग तज्ञ व शासन या दृष्टीने सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

लहान मुलांना या पासून त्रास होऊ नये म्हणून काय करावे?

 1. आपण आत्तापर्यंत पाळत असलेलं कोरोना अॅप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच मास्क ,हातांची स्वच्छता व सोशल डिस्टंसिंग पाळणे चालू ठेवावे .
2. काही लक्षणे जसे सर्दी अथवा ताप असलेल्या मुलांबरोबर आपल्या मुलांना खेळण्यास पाठवू नये .
3. आपण स्वतः बाहेर असताना आपल्याला कोराना इन्फेक्शन होऊन आपण घरात जाऊन मुलांना  ते इन्फेक्शन देऊ अशाप्रकारे वागू नये .
4.मुलांना घरच्या घरी व्यायाम करायला लावा व सकस आहार द्या
5. आपल्या मुलांना ताप, सर्दी , संडास ,खोकला आल्यास त्वरित बाल रोग तज्ञांना दाखवावे व त्यांनी  सांगितल्याप्रमाणे तपासण्या करून घ्याव्या व त्यांनी पुनर्तपासणी साठी जेव्हा बोलावले असेल तेव्हा परत जाऊन दाखवावे.
6. मुलांना काही लक्षणे दिसली तर पहिल्या दिवशी दाखवावे घरी उपचार करून वेळ वाया घालवू नये
7. मुलांचे लसीकरण मागे पडले असेल तर आपल्या बाल रोग तज्ञांना दाखवून लसीकरण पूर्ण करून घ्यावे.

 फ्लू लसीकरण करून घ्यावे

आता पावसाळ्या बरोबर आपल्याकडे साधारण फ्लू व स्वाईन फ्लू हा आजार  दिसतो .यामध्ये सर्दी ,ताप व खोकला  असतो. अशीच लक्षणे कोरोना या आजारात दिसतात. त्यामुळे आपल्या मुलांना फ्लू व स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून आय. ए. पी.( इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक) ने सांगितल्याप्रमाणे सहा महिने ते पाच वर्षांमधील सर्व मुलांना फ्लू चे डोस दिलेच पाहिजेत. पाच वर्षांवरील सर्व मुलांना सुद्धा फ्लू चे डोस देणे योग्य राहील, या शिवाय कोमॉरबिडीटी असणाऱ्या वयस्कर लोकांनी , हेल्थकेअर वर्कर्सनी व गर्भवती महिलांनी सुद्धा पावसाळ्यापूर्वी फ्लूचा डोस घेणे योग्य राहील.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.