आष्टीतील थरारक घटना; मुलगा अटक
आष्टी । वार्ताहर
शहरातील विनायक नगर भागांमध्ये जन्मदात्या बापावर पोटच्या मुलाने बंदूकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.20) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. आष्टी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी असणार्या मुलाला अटक केली असून उपविभागीय अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष किसन लटपटे (50)असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर पोटचा मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे वय 24 याने घरगुती वादातून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्या. जखमीस गंभीर उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान संतोष लटपटे हे तीन महिन्यापूर्वी भारतीय सैन्य दलातील निवृत्त झाल्याची माहिती आहे त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता गुरुवारी सायंकाळी याच बंदूकीतून पोटच्या मुलाने तीन गोळ्या झाडल्या त्यातील दोन गळ्यात त्यांच्या पोटात गेल्या तरी एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आईला मारहाण झाल्याने राग अनावर झाल्याने किरण लटपटे यांनी आपल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की त्याचे वडील संतोष लटपटे दारू पिऊन आईला मारहाण सुरू केली होती त्यानंतर मला राग अनावर झाल्याने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
Leave a comment