जिल्ह्यासाठी 14 लाख कपाशी बियाण्यांची मागणी

शेतकर्‍यांना 1600 कोटींच्या पीक कर्जाचे नियोजन

बीड । वार्ताहर

कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची पेरणी करण्याची लगबग शेतकर्‍यांकडून सुरु झाली आहे. गतवर्षी कापसाचे चांगले उत्पन्न मिळाल्याने यंदाही खरिपात कापूस आणि सोयाबीनवरच शेतकर्‍यांचा भर राहणार असल्याने कृषी विभागाकडूनही खत व बि-बियाणांचा मुबलक पुरवठा करण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने सुमारे 14 लाख 50 हजर इतक्या बियाणे पाकिटांची मागणी नोंदवली असून आतापर्यंत 6 लाख 29 हजार पाकिटे प्राप्त झाली आहेत.दुसरीकडे यंदा जिल्ह्यातील डीसीसीसह 17 राष्ट्रीयकृत बँकांना खरिप पीक कर्ज वाटपासाठी 1600 कोटींचे उद्दिष्ट दिले गेले आहे. बँकांनी आता हे उद्दिष्ट गाठताना शेतकर्‍यांना अडचण न आणता कर्ज पुरवठा केला पाहिले अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या आहेत.

बीड जिल्ह्यात खरिप हंगामात कापूस, सोयाबीन, तूरल मुग,उडीद ही प्रमुख पिके घेतली जातात, एकूण 5 लाख 32 हजार 136 हेक्टर इतके अंदाजित क्षेत्र असले तरी या क्षेत्रात दीड लाखाने वाढ गृहित धरली जाते. सध्या 1 लाख 64 हजार 990 मे. टन खत जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहे तसेच गतवर्षीचे 84 हजार 566 मे. टन खत शिल्लक होतेशेतकर्‍यांसाठी बी-बियाणे मुबलक प्रमाणात आहेत मात्र विशिष्ट वाणाचा आग्रह धरु नये तसेच रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा. असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे. तसेच शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बीड जिल्हा स्तरावर 1 व प्रत्येक तालुकास्तराव 1 असे एकूण 12 पथके स्थापन केली गेली आहेत.
जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यामुळे शेतकर्‍यांना खरीप पेरण्यांचे वेध लागले आहेत. यंदा जिल्ह्यात 6 लाखाहून अधिक क्षेत्रावर खरिपाचा पेरा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. पीकनिहाय क्षेत्र लक्षात घेतले तर कापूस 3 लाख 32 हजार हेक्टर, सोयाबीन 2 लाख 59 हजार,बाजरी 64 हजार 699, मका 9 हजार 308, तूर 61 हजार 308, मूग 22 हजार 293, उडीद 27 हजार 617 व भूईमूग 4 हजार 284 हेक्टर इतके क्षेत्र आहे. दरम्यान गतवर्षी अंबाजोगाई, परळी येथे सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या.दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांनी घरगुती बियाणाचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

1 जूननंतरच होणार कपाशी बियाणांची विक्री

दरवर्षी जिल्ह्यात कपी अधिक प्रमाणात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. पूर्व हंगामी लागवडीमुळे हे घडते. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा शेतकर्‍यांना 1 जूननंतरच कापूस बियाणे विक्री करावेत, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे 15 मे नंतर होलसेल कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून रिटेलरला विक्री होईल. त्यानंतर किरकोळ विक्रेत्यांना निविष्ठा दिल्या जातील. वळवाच्या पावसावर पेरणी न करता 70 ते 90 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.