दुध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत
आष्टी । वार्ताहर
मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या पाश्वभुमीवर लॉकडाऊन सुरू झाले आणि दुध व्यावसायाला उतरती कळा लागली. अगदी 18 रूपये प्रतिलिटर प्रमाणे दुधाचे भाव खाली आले होते. परंतु जानेवारी - फेब्रुवारी पर्यंत पुन्हा दर 30 - 32 रूपयांत गेले. पुन्हा मार्च - एप्रिल हेच 24 रूपये प्रतिलिटर पर्यंत कमी झाले आहे. त्यानंतर मे महिन्यात तब्बल दहा रूपयांनी दुधाचे दर कमी झाले. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.
गेल्या मार्च 2020 पासुन दुध धंद्याची वाट लागण्यास सुरूवात झाली आहे. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दुधाचे भाव टप्प्याटप्प्याने 18 रूपये प्रतिलिटर पर्यंत खाली आले होते. या काळात माञ पशुखाद्यांचे भाव लॉकडाऊन च्या नावाखाली वाढत गेले. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी तग धरत दुध व्यावसाय टिकुन ठेवला होता. ऑक्टोबर नंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने दुधाचे दर वाढत जाऊन 30 ते 32 रुपयांपर्यंत गेले होते ते सध्या 24 ते 25 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. अजुन हे भाव कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुन्हा दुध व्यावसायिक शेतकर्यांना वाईट दिवस येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे दुध व्यावसायिक शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुध उत्पादन करण्यासाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होत आहे. वाढलेले पशुखाद्यांचे भाव, वैद्यकीय खर्च आणि करावी लागणारी मेहनत याचा विचार केला तर खर्चच अधिक होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्नामध्ये ताळमेळ बसेना त्यामुळे शेकर्यांसमोरील चिंता वाढल्याचे शेतकरी बोलत आहेत.कोरोनाचा वाढता प्रसार यामुळे महाराष्ट्रासह देशांमध्ये लॉकडाऊन प सुरू आहे यामुळे दुधापासून बनणार्या उपपदार्थाची मागणी घटली आणि मागणी घटल्यामुळे दुधाचे दर तब्बल 32 रुपयांवरून 22 रुपयवर आले मात्र पशुखाद्याचे दर लॉकडाउनच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढतच आहेत सध्या सरकी पेंड बत्तीस रुपये क्विंटल तर भुसा 2500 रुपये क्विंटल असा दर आहे तोच दर गेल्या वर्षी सरकीचा दोन हजार पाचशे होतात तर भुशाचा सोळाशे रुपये दर होता. एकीकडे दुधाचे भाव कमी होत असताना पशुखाद्याचे भाव वाढल्याने शेतकर्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. दुधाचे भाव जरी कमी झाले तरी जनावरांना खुराक देण्याचे बंद करता येत नाही.महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायिकांना अनुदान दिले आहे मात्र शेतकर्यांना वार्यावर सोडल्याचे चित्र सध्या दिसत आहे .दुधाचे दर दहा रुपयांनी कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने दुधाला अनुदान देण्याची मागणी जोर धरत आहे. 2016 - 17 साली अशाच प्रकारे दुधाचे भाव पडले असताना देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पाच रुपये लिटर प्रमाणे अनुदान शेतकर्यांना देऊन हातभार लावण्याचे काम केले होते तशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शेतकर्यांच्या दुधाला अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.
Leave a comment