पोस्ट कोव्हिड आजारातील जीवघेणा आजार
माजलगाव । वार्ताहर
माजलगाव तालुक्यात पोस्ट कोव्हिडं आजारापैकी जीवघेणा असणारा म्युकर मायकोसिस या आजाराचे 5 रुग्ण येथील रेणुकाई रुग्णालयात सापडले आहे.पोस्ट कोव्हिडं आजारातील हा जीवघेणा आजार असून याचा मृत्यू दर 60 टक्के आहे. कोरोनातील बरे झालेल्या रूग्णांना अचानक डोके दुखणे, डोळा सुजणे, डोळा दुखणे, नजर कमी होणे, डबल दिसणे, नाकातील श्वास कोंडणे, दात हालणे, दात दुखणे ही लक्षणे दिसून आली तर त्यांनी लवकरात लवकर उपचार घेण्याचा सल्ला नेत्रतज्ञ डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिला आहे.
कोरोना विषाणु संसर्गाच्या दुसर्या लाटेमध्ये कोरोनातुन बरे झालेल्या रूग्णांच्या शरीरात बुरशीजन्य जंतुचा संसर्ग म्हणजेच फंगल इन्फेक्शन होवू लागले आहे ते म्हणजे म्युकरमायकोसीस. कोरोनानंतर रूग्णाची कमी झालेली प्रतिकारशक्ती सोबतच अनियंत्रीत मधुमेह हे याचे मुख्य कारण आहे. नाकातुन सायनसव्दारे संक्रमण सुरू होते पुढे ते तोंडाच्या आतुन वरचा जबडा, डोळे व मेंदुपर्यंत पोहचते. डोळा कायमचा निकामी होतो, पॅरॅलिसिस व मृत्यु ओढावतो हा आजार अत्यंत गंभिर असून याचा मृत्यूदर 60 टक्यांपर्यंत असुन त्याची लक्षणे डोके दुखणे, नांक चोंदणे, वरच्या पापणीला सुज येणे, पापणी खाली येणे, डोळा पुढे आल्यासारख वाटणे, डोळ्याची हालचाल मंदावणे, वस्तू दोन दोन दिसणे,डोक्याभोवती त्वचा काळसर होणे ही लक्षणे आहेत. म्युकरमायकोसिस चे निदान अत्यंत अवघड असते .डोके, सायनस व मेंदुचा एमआरआय स्कॅन करावा लागतो. नाक, कान, घसा तज्ञांकडून नाकातील द्रव्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी लागते. या आजाराचे उपचार अत्यंत खर्चीक असतात. महागड्या इंजेक्शन सोबतच सर्जरची गरज पडते. त्यासाठी डोळ्याचे, नाक, कान, घसा, दाताचे तज्ञ, शल्यचिकित्सक, मेंदुविकारतज्ञांची टिम लागते. या घातक आजाराचा मृत्युदर 60 अक्के हून अधिक असतो. दुस-या लाटेमध्ये औरंगाबादेत 24 रूग्णांचा मृत्यु झाला आहे व 13 जणांचे डोळे काढावे लागले आहेत. तर 201 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे. औरंगाबाद सोबतच अमरावतीत 300 रूग्णांना लागण झाल्याची माहिती डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली आहे.
मधुमेहींनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी
रूग्णांनी घाबरून न जाता रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. मधुमेहींनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी व लक्षणे आढळल्यास डोळ्याच्या, नाकाच्या किंवा दंतरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. मागिलल विस वर्षाच्या रूग्णसेवेत फक्त एक रूग्ण पाहिले होती तर मागील एक महिण्यांमध्ये पाच संशयित रूग्ण पुढील उपचाराकरीता पाठविले आहेत अशी माहिती रेणुकाई नेत्र रूग्णालयाचे संचालक डॉ.स्वानंद कुलकर्णी यांनी दिली आहे.
Leave a comment