२० युवकांचा सहभाग
बीड । वार्ताहर
कोविड - १९ मुळे रक्ताचा भासत असलेला तुटवडा आणि कोविडची लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्यामुळे हिंगणी (खुर्द) येथील युवक फौंडेशनच्या तरुणांनी कोविडची लस घेण्यापूर्वी हिंगणी (खुर्द) येथे ८ मे शनिवार रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण २० तरुणांनी रक्तदान केले. सदरील रक्तदान शिबीरात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सामाजिक आंतर राखत रक्तदान शिबीर पार पाडले.
देशात आलेल्या कोरोनासारख्या महामारी मुळे अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत असून वेळेवर रक्त भेटत नाही म्हणुन हिंगणी खुर्द येथील तरुणांनी पुढाकार घेत युवक फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. तरुणांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराबद्दल गावकऱ्यांकडून सदरील तरुणांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सदरील कार्यक्रमात सौरभ तांदळे, सचिन नागरगोजे, शिवराज तांदळे, रवी आंधळे, संदीप खाडे, बाबुराव आंधळे, वामन तांदळे, अंकुश तांदळे, अक्षय तांदळे, अनिकेत उगलमुगले, किरण तांदळे, सुशील आंधळे, दत्ता नागरगोजे, कृष्णा आंधळे, अशोक आंधळे आदींनी रक्तदान केले तर पांडुरंग तांदळे, नवनाथ तांदळे, अजय बांगर यांच्यासह युवक फौंडेशनच्या तरुणांनी सदरील रक्तदान शिबीरासाठी विशेष परिश्रम घेतले.
Leave a comment