झाल्याने अनेक लाभार्थी लस न घेता परतले

बीड । वार्ताहर
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी होऊन गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र हलवण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी (दि.7) सकाळपासून नगर रोडवरील चंपावती विद्यालयात लसीकरण सुरू झाले खरे मात्र या ठिकाणी 45 वर्षापुढील नागरिकांना केवळ कोव्हॅक्सीन या लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला. तसेच 18 ते 44 वर्ष वयोगटातील नोंदणी केलेल्या 200 लाभार्थ्यांना कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान पहिला डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी उपलब्ध नसल्याने त्यांना लस न घेता घरी परतावे लागले. लसीचा तुटवडा असल्यामुळे ही सारी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या वेगाने सुरु आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हा रुग्णालयात लसीकरणादरम्यान गोंधळ उडाला. या वेळी पोलिस उपअधीक्षकांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. शिवाय, जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णही असतात त्यामुळे इथले लसीकरण केंद्र हलवण्याचा निर्णय घेतला गेला असून नगर रोडवरील चंपावती विद्यालयात आज शुक्रवारपासून लसीकरणास सुरूवात झाली. 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी नंतर तर 45 व पुढील नागरिकांना थेट लस मिळेल मात्र केवळ 200 जणांना लस दिली गेली. त्यानंतरच्या नागरिकांना लसीसाठी ऑफलाइन नोंदणी करुन घेता येईल नंतर त्यांना प्राधान्याने लस दिली जाईल. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण सुरु राहिल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली. दरम्यान चंपावती विद्यालयात लसीकरणासाठी लाभार्थ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. सध्या 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना केवळ कोव्हिशील्ड लस दिली जात असून कोव्हॅक्सीन लस मात्र उपलब्ध नाही. चंपावती विद्यालयात लसीकरणासाठी तीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये कक्ष क्रमांक 1 मध्ये 45 वर्षावरील नागरिकांसाठी केवळ लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला. तसेच कक्ष क्रमांक 2 मध्ये कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस 200 जणांना दिला गेला. तर कक्ष क्रमांक 3 मध्ये 18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या 200 लाभार्थ्यांना कोव्हिशील्ड लस टोचवण्यात आली. लसीकरण ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचार्यांकडून ध्वनीक्षेपकावरून उपलब्ध असलेल्या लसीचा साठा व त्यानुसार होत असलेले लसीकरण याची माहिती दिली जात होती. लसीकरण ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.