महिन्याला जमा करा फक्त 55 रुपये
काय आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना?
नवी दिल्ली
प्रधानमंत्री किसान कल्याण योजनेतील किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये दिले जात आहेत. परंतु, सरकारची आणखी एक योजना देखील आहे. ज्याअंतर्गत शेतकरी वर्षाकाठी 36000 हजार रुपये मिळवू शकतात. प्रधानमंत्री किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशातील छोट्या शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. त्यापैकीच ही एक योजना आहे. याअंतर्गत शेतकरी वर्षाकाठी पेन्शन म्हणून 36000 रुपये मिळवू शकतात. या योजनेचा कसा आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल, त्याचा
पंतप्रधान किसान मानधन योजना पंतप्रधान किसान पेन्शन योजना म्हणूनही ओळखली जाते. केंद्र सरकारने 31 मे 2019 रोजी ही योजना सुरू केली होती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकर्यांच्या मदतीसाठी ही योजना सुरू केली आहे. ही एक निवृत्तीवेतन योजना आहे. याअंतर्गत शेतकऱ्याला वयाच्या 60 व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.
प्रधानमंत्री किसान समाज योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
18 ते 40 वर्षे वयोगटातील आणि अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
ज्यांची 2 हेक्टर किंवा त्याहून कमी शेतजमीन आहे.
किसान पेन्शन योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- वयाचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- शेताचा सातबाराचा उतारा
- बँक खाते पासबुक
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ कसा मिळेल, काय आहे नोंदणीची पद्धत?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी CSC) वर जाऊन नोंदणी करता येईल. तथापि, आपण स्वतःही यासाठी नोंदणी देखील करू शकतो. सर्व कागदपत्रे नोंदणीच्या वेळी जवळ ठेवावी लागतील.
सर्वप्रथम योजनेची अधिकृत वेबसाइट (maandhan.in) वर जावे लागेल.
वेबसाइटवर जाऊन लॉग इन करण्यासाठी (maandhan.in/auth/login), पेजवर दिसणाऱ्या क्लिक हिअर टू अप्लाय या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
लॉगिन दरम्यान, अर्जदारास त्याचा फोन नंबर टाकावा लागेल.
याशिवाय नाव, पत्ता, मोबाइल नंबर, कॅप्चा कोड इत्यादी मागितली जाणारी इतर माहिती प्रविष्ट करावी लागेल.
यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो भरल्यानंतर, एक अर्ज आपल्यासमोर येईल.
या अर्जामध्ये मागितलेली माहिती भरून सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट काढता येईल. जेणेकरून येणाऱ्या काळात केव्हाही सहज वापर करता येईल.
किती नफा मिळेल?
किसान निवृत्तीवेतन योजनेतील नियमांनुसार, जर एखादा शेतकरी (ज्याची 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन शेती आहे) 18 वर्षे वयाचा असेल तर, त्याला दरमहा 55 किंवा वर्षाकाठी 660 रुपये जमा करावे लागतील. यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर त्याला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल. सरकारने सर्व वयोगटातील शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली रक्कम दरमहा आणि वार्षिक जमा करावी. म्हणजेच, जर आपण 25 वर्षांचे असाल तर आपल्याला या योजनेंतर्गत किती पैसे जमा करावे लागतील, याबद्दल योजनेत माहिती दिली गेली आहे. विशेष म्हणजे आपण या योजनेत जेवढे पैसे जमा कराल, तितकेच सरकारही जमा करेल.
मध्येच योजना सोडून दिल्यास किंवा लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास पैशांचे काय होईल?
जर लाभार्थी योजना मध्येच सोडली किंवा पैसे जमा करणे थांबवले तर, तोपर्यंत जमा केलेले पैसे सुरक्षित असतील. जमा केलेल्या रकमेवर, बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतकी रक्कम व्याज म्हणून मिळेल. जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू वैगेर झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के पैसे मिळत राहतील.
Leave a comment