गर्दीमुळे लसीकरणाच्या ठिकाणात बदल
बीड । वार्ताहर
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी होऊन गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आज शुक्रवारपासून (दि.7) नगर रोडवरील चंपावती विद्यालयात लसीकरण होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या वेगाने सुरु आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हा रुग्णालयात लसीकरणादरम्यान गोंधळ उडाला. या वेळी पोलिस उपअधीक्षकांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. शिवाय, जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णही असतात त्यामुळे इथले लसीकरण केंद्र हलवण्याचा निर्णय घेतला गेला असून नगर रोडवरील चंपावती विद्यालयात शुक्रवारपासून लसीकरण केले जाणार आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल तर 45 व पुढील नागरिकांना थेट लस मिळेल मात्र केवळ 200 जणांना लस दिली जाईल त्यानंतरच्या नागरिकांना लसीसाठी ऑफलाइन नोंदणी करुन घेता येईल नंतर त्यांना प्राधान्याने लस दिली जाईल. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण सुरु राहिल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.
Leave a comment