स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

फोनवरुन देवेंद्रसिह यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप

बीड । वार्ताहर

बीड जिल्हा मधून राष्ट्रीय महामार्ग 211 गेलेला असून त्यामध्ये शेतकयाच्या जमिनी संपादित  झालेल्या होत्या व त्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकरी यांना दिला परंतु संबंधित शेतकरी यांनी आम्हाला कमी दर दिला म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या कडे अपील दाखल केले जवळपास 90% शेतकर्‍यांनी अपील दाखल केले परंतु तत्कालीन अधिकारी यांनी काही धनवान शेतकरी यांच्याशी संगनमत करून त्यातील तुरळक काही बीड मधील नामांकित गरीब असे धनदांडगे यांच्याशी आर्थिक व्यवहार करून त्यांना वाढीव दर देऊन शासनाची करोडो रुपयाची लूट केली यां सर्व प्रकरणांची आपण चौकशी करावी या भष्ट्र अधीकारी यांना शासकीय सेवेतून निलंबीत करून त्यांच्यावर भा.दं.वि. 420 प्रमाणे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांनी केली आहे. 

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात माहिती अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला  मला अव्वल कारकून श्रीधर वखरे यांचा फोन आला व मला माहिती कशाला पाहिजे ते विचारले त्यानंतर मी त्याची भेट घेतली व मला कागदपत्रे कधी मिळतील असे विचारले. त्यांनी मला 918 पाने झाली व त्यांचे चलन 1836 रु भरा म्हणून पत्र व चलन दिले. मी त्याच दिवशी  चलन भरून कागदपत्रे मागितली. तुम्हाला माहिती कशाला पाहिजे हे विचारले मी त्यांना सांगितले की, यामध्ये असा भष्ट्राचार आहे पण त्या दिवशी त्यांनी मला माहिती देत येत नाही असे सांगितले. मी विचारले का माहिती देत येत नाही तुम्ही माझ्याकडून चलन भरून घेतले आहे आता कशी काय माहिती देत येत नाही. तर त्यांनी मला त्या दिवशी माहिती दिली नाही आणि दुसर्‍या दिवशी यालयला सांगितले मी गेलो असता ते त्या दिवशी रजेवर असल्याचे समजले  त्यानंतर  त्या दिवशी मला काही लोकांचे भेटले व ते मला धमकावू लागले की ‘तू एम. देवेंद्रसिंग यांच्या काळातील (लवाद ) भूसंपादन यांची माहिती का मागवली तुला आम्ही बीड मध्ये राहू देणार नाही तू तुझा माहिती अधिकाराचा अर्ज माघारी घे’ नाहीतर तुला जिवे मारून टाकू त्यानंतर दि.1 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मी पोलीस  शहर ठाण्यात जात असताना मला वाटेत एक जण भेटला आणि मला बोलला की तुला काहीतरी बोलायचे आहे थांब मी त्याला बोलत असताना त्याला एम. देवेंद्र सिंग यांचा 4 वेळेस फोन आला व तो वक्ती मला साहेबाना बोल असे बोलला मी त्यांना फोन वर बोलत नाही असे सांगितले असता त्यांनी मला व्हॉटसअ‍ॅपवर कॉल करन बोलायला लावले. 

मला देवेंद्रसिंह यांनी ‘सचिन भाई क्या प्रॉब्लेम हें तुझको’ असे विचारले ‘मी कुछ नही’ असे सांगितले देवेंद्रसिंह मला बोलले ‘कुछ नही तो तुने कल ओ माहिती नही लेने की, अगर तुने ऑफिस में जाके माहिती लिये तो तुझको कहा मारके फेक दुगा तुझजो व तेरे घर वालोको पत्ता भी नही चॅलेंगा, में एक कलेक्टर हू मेरा कोई कुछ भी नही कर सकता’ असे म्हूणन फोन ठेवला .दुसर्‍या दिवशी मी ऑफिसमध्ये जाऊन श्रींधर वखरे यांना माहिती मागीतली तर त्यांनी मला माहिती देता येत नाही असे सांगितले. तसेच चंद्रकांत सुर्यवंशी यांचा फोन आला होता आणि त्यांनी माहिती देऊ नको असे सांगितले आहे. त्यानंतर त्यांना घेऊन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे घेऊन गेलो. जगताप यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यांनी मला माहिती द्या असे सांगितले. त्यानंतर वखरे यांनी जिल्हाधिकारी यांनी माहिती द्यायला सांगितली असता उपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांची मान्यता घेऊन माहिती देतो. जन महिती अधिकारी वखरे असतांनाही त्यांनी मला त्या दिवशी पण टाळले नंतर दुसर्‍या दिवशी मी जिल्हाधिकारी  यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की वखरे यांनी माहिती दिली नाही. नंतर जगताप यांनी तात्काळ मला माहिती देण्याचे आदेश दिले. त्यानंतर मला माहिती दिली ती पण अर्धवट  माहिती दिल्यानंतर 2 दिवसांनी अव्वल कारकून श्रीधर वखरे यांचा मला फोन आला व मला भेटायचे आहे कुटे भेट होईल असे बोलले त्यानंतर मी त्यांना सुभाष रोड येथे आहे असे सांगितले. अर्धा तासाने श्रीधर वखरे आले व मला सहयोगनगर येथील स्वामी समर्थ मंदिरजवळ घेऊन गेले. यामध्ये माझा आणि तत्कालीन अधिकारी विकास माने यांचा काही एक संबंध नाही. मी आणि माने साहेब, देवेंद्रसिंह यांच्या कॅबिन बाहेर थांबायचो.यामध्ये जे काही भष्टचार केला आणि लोकेंकडून पैसे घेतले आहेत ते चंद्रकांत सुर्यवंशी व देवेंद्र सिंग यांनीच घेऊन भष्ट्राचार केलेला आहे असे सांगितले असे वखरे यांनी सांगीतले.

त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व श्रीधर वखरे यांची चौकशी करावी व त्यांच्या संपत्तीची  पण चौेकशी करावी. भ्रष्टाचाराचे पुरावे देतो.तसेच चंद्रकांत सुर्यवंशी यांच्याकडे भूसंपादन लघु पाटबंधारे विभागाचा अतिरिक्त पदभार असतांना त्यांनी गाव तलाव व पाझर तलावाचा अनेक फाईलमध्ये भष्ट्राचार केलेला आहे ज्या ठिकाणी 2 हे क्षेत्र संपादित होत आहे त्या ठिकाणी क्षेत्र वाढवून जास्तीचा दर देऊन शासनाची पसवणूक करून करोडो रुपयाचा चुना शासनास लावलेला आहे. त्या पण सर्व फाईलचे देण्यास मी तयार आहे असे प्रा.सचिन उबाळे यांनी निवेदनातून म्हटले आहे. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांना चौकशी होईपर्यंत सध्या कोठेही पोस्टिंग देवू नये कारण माझ्या काही जीवाचे बरे वाईट झाले तर त्याला वरील सर्व वक्ती जबाबदार राहतील आणि या सर्व लोकांच्या संपत्तीची चोकशी करावी अशी मागणीही प्रा.सचिन उबाळे यांनी निवेदनातून केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.