केज । वार्ताहर

तालुक्यातील चंदनसावरगाव येथील एका वस्तीवर अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून आग लागली.  शनिवारी (दि.1) दुपारी घडलेल्या या घटनेत शेतकर्‍याचे सोयाबीन, हरबरा,गहू या पीकांसह दुचाकी, पाण्याचे पाईप, कडब्याची गंजी व संपूर्ण निवाराच जळून भस्मसात झाला. अग्निशमन दलाच्या गाडीमुळे ही आग आटोक्यात आली त्यामुळे इतर शेतकर्‍यांचा धोका टळला .
चंदनसावरगाव येथील वस्तीवरील तुकाराम साहेबराव तपसे यांच्या शेतातील घरावर शनिवारी अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळली. यामुळे या ठिकाणी ठेवलेले सोयाबीन, हरभरा, गव्हु ई धान्यासह पाण्याचे पाईप तसेच मोटारसायकल सह कडब्याची गंजी जळून खाक झाली. दुपारी तीनच्या दरम्यान वादळ वार्यामधे आलेल्या पावसात अचानक पडलेल्या या विजेपासून हा शेतकरी बालंबाल बचावला आहे. ही आग एवढी मोठी होती की पाहता पाहता या ठिकाणी असलेल्या पुर्ण वस्तीलाच धोका निर्माण झाला होता. अग्निशमन दलाच्या गाडीमुळे आग आटोक्यात आणली गेली, परंतु तोपर्यंत तुकाराम तपसे या शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान झाले होते.
वस्तीवरील गावकरी मोठ्या संख्येने  आग विझवण्यासाठी धावले होते. अवकाळी पावसामुळे शेतकरी भयभीत झालेले असतानाच आज चंदनसावरगावात वीज पडली व शेतकर्‍याचे मोठ्ठे नुकसान झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच याच गावच्या शिवारात वीज पडून एका युवकाचा जीव गेला होता. ही घटना ताजी असतानाच याच गावच्या शिवारामधे आणखी विज पडून मोठे नुकसान झाले आहे. नशिब बलवत्तर म्हणून या ठिकाणी जिवीतहानी टळली आहे. मात्र या घटनेमुळे गावातील वातावरण भयभीत झाले आहे. तुकाराम तपसे यांच्या झालेल्या या नुकसानीमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.