सरपंच, ग्रामसेवक, तलाठी नेमके काय करतात?
बीड | वार्ताहर
तालुक्यातील अंबील वडगाव येथे कोरोनाने थैमान घातले असतांना सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्या आशीर्वादाने गावातील अवैध दारू दुकाने, पानाच्या टपर्या खुलेआम सुरू असून गावामध्ये जवळपास 150 कोरोना बाधीत असून एकाचा मृत्यूही झालेला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी हे लोक आणखी किती बळी घेणार असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
नेकनूरपासून जवळच असलेल्या अंबीलवडगाव येथे सरपंच, ग्रामसेवक व तलाठ्याच्या आशीर्वादाने अवैध दारू दुकाने सर्रास चालू आहेत. या ठिकाणी लोक गर्दी करत असल्याने कोरोनाला अंमत्रण मिळत आहे. त्याच बरोबर गावातील पानाच्या टपर्या सर्रास उघड्या असल्याने यामुळेही कोरोनाला निमंत्रण मिळत आहे. जिल्हा बंदी असल्याने गावातील किराना दुकाने, दिवसभर चालू आहेत. या गर्दीमुळे गावात जवळपास 150 रूग्ण कोरोना बाधीत झालेले असून एका 33 वर्षीय तरूणाचाही मृत्यू झालेला आहे. या बाबीकडे नेकनूर पोलीसांचेही दुर्लक्ष होतांना दिसत आहे. सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांची जबाबदारी असतांना ही जबाबदारी झटकत गावाला कोरोनाच्या खायित लोटले जात आहे. अंबीलवडगावचे सरपंच बाबुराव किलमीशे, ग्रामसेवक सय्यद, तलाठी संतोष हंगे यांच्यावर जिल्हाधिकार्यांनी कठोर कारवाई करावी. तसेच या बाबीकडे दुर्लक्ष करणार्या नेकनूर पोलीसांवरही पोलीस अधीक्षकांनी कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
Leave a comment