प्रा.शिवराज बांगर यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट 

बीड । वार्ताहर

 

बीडमध्ये बनावट रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रकार उघडकीस आला असतांना, आता बोगस एचआरसीटी स्कोअर देणार रॅकेट सक्रिय झालं  आहे. संबधित दवाखाना आणि सिटी स्कॅन सेंटर यांच्यात संगनमत आहे. त्यामुळे आजाराची गंभीरता नसताना रुग्णाचे प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीडमध्ये एचआरसीटी स्कोअर वाढविणार रॅकेटचा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांनी बोगस प्रकार समोर आणला असून  जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.  

        जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, एक २७ वर्षीय महिला या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांचा जिल्हा रुग्णालयात एचआरसीटी स्कोअर तपासला असता ३ स्कोअर दिला होता. सदरील महिलेने शहरातील शिवाजीराव हार्टकेअर सेन्टरमध्ये एक्सरे काढला असता नॉर्मल आला. त्यांनी पुन्हा शहरातील युवनिक ऍडव्हान्स  सिटी सेन्टरमध्ये एचआरसीटी स्कोअर तपासणी केली असता १० स्कोअर दिला. हा सर्व प्रकार केवळ १ ते २ तासात घडला आहे. असेही या तक्रारीत नमूद करण्यात आहे. 
     दरम्यान अशा स्वरूपाचे बोगस एचआरसीटी स्कोअर देणारे रॅकेट बीडमध्ये असण्याची शक्यता असून यामुळं सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक शोषण सुरू आहे. यामुळं ज्यांनी बोगस अन चुकीचे रिपोर्ट दिले आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी  जिल्हाधिकारी यांना  दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.