माजलगाव । वार्ताहर

माजलगाव शहर व तालुक्यातील कोविड रुग्णांच्या प्रथमोपचारासाठी तसेच विलगीकरण कक्षासाठी माजलगाव येथील तुळजाभवानी अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव च्या पुढाकारातून अपेक्स आय टी कॉलेज भाटवडगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.  सदरील कोविड केअर सेंटर मार्फत देण्याच्या येणार्‍या सर्व सुविधा विनामुल्य असणार आहेत. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज दिनांक 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव डक,  बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाठ,  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा जिल्हा परिषद बीड चे बांधकाम सभापती जयसिंग भैय्या सोळंके, माजलगाव पंचायत समितीच्या सभापती सौ. सोनाली ताई खुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. आर बी पवार, माजलगाव च्या तहसिलदार वैशाली पाटील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत शासनाने केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकीतून हे कोविड सेंटर सुरु करण्यात येत आहे . तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. गतवर्षीही कोरोना काळामध्ये संस्थेने सामाजिक बांधीलकिच्या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. आकरा लाख निधी दिला होता. या ही वर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये संस्थेने सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी अत्यावश्यक असणारे कोविड केअर सेंटर उभारण्याचे ठरविले आहे. समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून ही संस्था कार्य करत असते.  हे कोविड केअर सेंटर अनेक रुग्णांच्या फायद्याचे ठरणार असून या कोविड केअर सेंटरचा लाभ माजलगाव तालुक्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.