आयसोलेशन सेंटरच्या रूग्णांसाठी आजपासून नांव नोंदणी

 

परळी । वार्ताहर

कोरोना संक्रमित रूग्णांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ’सेवा यज्ञ ’ सुरू करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरसाठी रूग्णांच्या नांव नोंदणीला उद्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात होणार असून 3 मे पासून सेंटर मध्ये रूग्ण सेवेला सुरवात होणार आहे.

सध्या सर्वत्र कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून परळी व परिसरात रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा संकट काळात कोरोना रूग्ण व त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रूग्णांना आयसोलेशन सेंटर व  घरपोंच भोजनाची व्यवस्था केली आहे.शहराच्या शिवाजी चौकातील अक्षता मंगल कार्यालयात सर्व सोयींनी युक्त असे शंभर बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले असून प्रसिद्ध डॉ. हरिश्चंद्र वंगे, डॉ. शालिनी कराड, डॉ. विवेक दंडे, डॉ. यशवंत देशमुख, डॉ. दिपक पाठक, डॉ. वाल्मिक मुंडे आदींचे सल्ला व मार्गदर्शन लाभणार आहे.   या सेंटर मध्ये लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांवर मोफत औषधोपचार, नाश्ता, जेवण, तज्ज्ञ डॉक्टर्स कडून तपासणी आदी केले जाणार आहे. पिण्याचे पाणी,  लाईट, स्वच्छतागृह आदी सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा येथे असून रूग्णांची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच मोफत जेवणाचा डब्बा देखील दिला जाणार आहे. प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यासाठी मेहनत घेत आहेत.

आजपासून नांव नोंदणी

आयसोलेशन सेंटर व घरपोंच जेवणाचा डब्बा यासाठी रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उद्या 1 मे पासून नांव नोंदणी करता येणार आहे. आयसोलेशन सेंटर करिता शहरासाठी -

जुगलकिशोर लोहिया (9422241950), उमेश खाडे (9423277731), योगेश पांडकर (9823775044), गोविंद चौरे (9763243333) ग्रामीण साठी सतीश मुंडे (9405257777), शिवाजीराव गुट्टे (9623443721), उत्तम माने

(9860339326), रवि कांदे (9028034242), सुरेश माने (9403301212) अंबाजोगाई ग्रामीण साठी जीवनराव किर्दंत (9405001212), प्रदीप गंगणे (9834308482), गणेश कराड (9822642222), शिवाजी गिते (9421343255),

बंडू चाटे (9403776517) *घरपोंच भोजन* व्यवस्थेसाठी -  राजेंद्र ओझा (8208083437), सचिन गित्ते (9421358888) नितीन समशेट्टी (9822478122) चंद्रकांत देवकते (9823079293) यांना संपर्क साधावा असे आवाहन

प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.