निर्धारित वेळेनंतरही विक्री सुरुच ठेवली म्हणून दंडेलशाही

बीड । वार्ताहर

संचारबंदीदरम्यान सकाळी 7 ते 11 या वेळेत भाजीपाला, फळविक्रेत्यांना मुभा आहे. मात्र, निर्धारित वेळेनंतरही विक्री सुरुच ठेवल्याने संतापलेल्या पोलिसांनी थेट फळ व भाजीपाल्याचे गाडे उलथवून दिले. पोलिसांच्या दंडेलशाहीचा हा प्रकार गुरुवारी (दि.29) शहरातील नगर नाका येथे घडला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आहे. या दरम्यान किराणा, बेकरी, भाजीपाला आणि फळविक्री अशा अत्यावश्यक सुविधांसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. तरीही अनेक फळ, भाजीपाला विक्रेते 11 वाजेनंतरही रस्त्यावर बसत आहेत. नगर नाका परिसरात गुरुवारी 11 वाजेनंतरही काही विक्रेते गाड्यांवरुन भाजीपाला, फळे विकत होते. निर्धारित वेळेनंतरही विक्रेते विक्री करत असतील तर त्यांना सूचना देणेेअपेक्षित आहे. यउपरही ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर  कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. मात्र, शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी गरीब विके्रत्यांचे गाडे उलथवून दिले. त्यामुळे फळे व भाजीपाला अस्ताव्यस्त पडला तर काही माल नालीत पडल्याने मोठे नुकसान झाले. पोलिसांच्या या दंडेलशाहीने विक्रेत्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान याबाबत शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना विचारले असता ते म्हणाले, नगर नाका परिसरात काही मच्छीविके्रत्यांना बंदोबस्तावरील पोलिसांनी हुसकावून लावले होते. मात्र, फळ व भाजीपाला विक्रेत्यांचे गाडे उलथून दिल्याचा प्रकार घडत असेल तर माहीत नाही.

असा प्रकार घडला असेल तर चूक-वाळके 

याबाबत उपअधीक्षक संतोष वाळके म्हणाले, पोलिसांनी फळे व भाजीपाल्याचे गाडे उलथून दिले असतील तर ते चूक आहे. यासंदर्भात विके्रत्यांची अद्याप तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.