प्रशांत कोळपकर यांचा अभिनव उपक्रम 

 डोंगरकिन्ही । अमोल येवले

नेहमी सामाजीक कार्यात सर्वात पुढे अग्रेसर असणारे,राजकीय असो की सामाजिक बांधीलकी जपणारे पाटोदा पंचायत समितीचे माजी सदस्य, तथा पत्रकार प्रशांत कोळपकर यांनी त्यांच्या रुद्राणी वस्त्र भांडार मधील कामगाराना दोन लाख रुपये चे  विमा कवच देऊन समाजमध्ये सामाजिक बांधीलकी जपत,आपल्या कुटुंबाप्रमाणे कामगार ही आपल्या कुटुंबाचा भाग आहेत त्यांना विमा कवच देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

 सध्या लॉकडाऊनमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील छोटे-छोटे दुकानदार अडचणीत आले आहेत. सततच्या लॉकडाऊनमुळे दुकानात काम करणार्‍या मुनिमांना दुकानदार नोकरीतून कमी करत आहेत. घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीतही डोंगरकिन्ही येथील एक कापड दुकानदार आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. डोंगरकिन्ही येथे प्रशांत कोळपकर यांचे रुद्राणी वस्त्र भांडार या नावाने कापड दुकान आहे. या दुकानातील एकही कर्मचारी गेल्या वर्षी कमी करण्यात आला नाही. लॉकडाऊनच्या काळात दुकान बंद असले तरी कर्मचार्‍यांच्या पगारात कोणतीही कपात करण्यात आली नाही.याउलट कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशांत कोळपकर यांनी त्यांच्या कर्मचारी वर्गाला एक लाख रुपयांचा कोविड विमा व दोन लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्सचे विमा कवच दिले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या दुकानात अंत्यविधी व दहाव्याच्या विधीला लागणारे सामान सर्वांना मोफत दिले जाते. त्याचप्रमाणे अनाथ व निराधार व्यक्तींसाठी काम करणार्‍या सेवाभावी संस्थानाही नियमित मदत केली जाते. हे दुकान जरी किरकोळ कापड विक्रीचे दुकान असले तरी इतर  व्यवहार कार्पोरेट कंपनीप्रमाणे आहेत. शासनाचे सर्व कर नियमित भरले जातात, उत्पन्नाचा काही हिस्सा समाजसेवेसाठी खर्च केला जातो. कर्मचार्‍यांना वागणूक कुटुंबातील सदस्याप्रमाणे दिली जाते.त्यांच्या या उपक्रमा मुळे तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. याबाबत प्रशांत कोळपकर म्हणाले,मी स्वतः उच्च शिक्षित असल्याने शासनाचे कर नियमित भरतो. घर, दुकान, गाडी व कुटुंबातील सदस्य या सर्वांचा काळजीपूर्वक विमा उतरवला जातो. जर माझ्या कुटुंबीयांना मी विमा संरक्षण देत आहे तर माझे कर्मचारी हेही मी कुटुंबाचे सदस्य समजतो. म्हणून त्यांना विमा संरक्षण देणे मी माझे कर्तव्य समजतो. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.