सध्या जिल्हा रुग्णालया मध्ये शहरीच्या तुलनेत ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यात चिंताजनक बाब ही की ग्रामीण भागातील बहुतांश रुग्णांचा HRCT स्कोर हा 15 च्या पुढे आणि 20 च्या जवळपासचा आहे. हे सगळं अंगावर दुखणे काढण्याचा परिणाम आहे.

 

गेल्या एक वर्षात मी 23 स्कोर असलेला रुग्ण पाहिलेला होता. परंतु आज वडवणी तालुक्यातील HRCT स्कोर 25/25 असलेला एक रुग्ण पाहिला आणि त्यामुळेच हा शब्दप्रपंच. हे लोक इतकं दुखणं अंगावर कसं काढू शकतात असा प्रश्न मला पडला. आता खरंच खेड्यांकडे जायची वेळ आलेली आहे. वेळीच जनजागृती झाली नाही तर किड्या-मुंग्यांसारखे माणसे मरतील.

 

गेल्या वर्षभरात माझ्यासारख्याला 12, 14 स्कोर असलेला रुग्ण अधिक गंभीर वाटत होता. प्रशासनाकडून त्याची काळजी ही त्या प्रकारे घेण्यात येत होती. सध्या जिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांमध्ये *आठ-दहा स्कोर* असलेल्या रुग्णांस देखील आयटीआय किंवा पॉलिटेक्निक कॉलेजला पाठवण्यात येते. हे इथे सांगण्याचं कारण केवळ यासाठीच की आपण अंदाज बांधू शकता किती मोठ्या संख्येने हाय स्कोरिंग पेशंट जिल्हा रुग्णालया मध्ये ऍडमिट असतील. तेथे एखाद्या रुग्णाला बेड मिळणे म्हणजे अक्षरशः लॉटरी लागण्यासारखे वातावरण झालेले आहे. त्यामुळे वेळीच गांभीर्य ओळखून शहरी सह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे.

 

ग्रामीण भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी. लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दुखणे अंगावर काढल्यामुळे किंवा स्थानिक स्तरावर उपचार घेतल्यामुळे दोन चार दिवस जरी वाया गेले तरी रुग्णाचा  HRCT स्कोर मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याचा सर्व ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. यातूनच रेमडेसिविर सारखे इंजेक्शन्स व ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ कोरोना चाचणी करण्याचे आवाहन ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्व सन्माननीय व्यक्तींनी करावे, तर आणि तरच कोरोना वर विजय मिळवणे शक्‍य होईल.

 

 

अमर मारुतीराव नाईकवाडे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.