नेकनूर । वार्ताहर

रुग्णांची वाढती संख्या पाहता नेकनूरमध्ये कोव्हिड केअर सेंटर सुरु करावे अशी मागणी होत असून जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांची सोमवारी भेट घेऊन मागणी केली. दोन दिवसात स्थळ पाहणी करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.  

नेकनूरसह परिसरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून याचा भार जिल्हा रुग्णालयावर पडत असल्याने शिवाय लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नेकनूरचा प्रशासनाने विचार करून लवकरात लवकर येथे रुग्णालय सुरू करावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत मागणी केली शासकीय अध्यापक विद्यालय, कुटीर रुग्णालय ,प्रमिला देवी महाविद्यालय वस्तीगृह असे पर्याय प्रशासनापुढे असून लवकरात लवकर रुग्णालय सुरू झाले तर परिसरातील रुग्णांची हेळसांड थांबणार आहे. गावाच्या बाहेर असलेला शासकीय अध्यापक विद्यालयाचा पर्याय सोयीस्कर असून यामुळे कुटीर आणि स्त्री रुग्णालयाच्या इतर रुग्णांना याचा त्रास होणार नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.