ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा

वडवणी । वार्ताहर 

तालुक्यातील पिंपरखेड येथील गावातील गरीब, दलित वस्तीत पिण्याचे पाणी साठी मागील एक महिन्यापासून भटकंती करावी लागत आहे ग्रामपंचायत लक्ष देईना त्यामुळे गावातील गरीब व दलित वस्तीमध्ये गेल्या एक महिण्या पासुन पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी महिलांनासोबत घेवून ग्रा.पं.समोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पिंपरखेड गावातील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी 56 लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना मिळाली आहे.पण ही योजना काही तांत्रिक अडचणीमुळे ग्रामपंचायतला हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा समिती व ग्रामपंचायत हे एकमेकांना दोष देत आहेत. यात ग्रामसेवक हे दोन दोन महिने गावात येतच नाहीत. सरपंच याकडे लक्ष देत नाहीत. म्हणून गावातील लोकांना पाणी मिळत नाही. तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतने एक कर्मचारी नेमला असून हा कर्मचारी गावातील पुढा-यांच्या दबावामुळे पाणी सुरूळीत करत नाही. काही तरी कारण सांगून टाळाटाळ करत आहे. यामुळे सर्व सामान्य लोकांना पाणी मिळत नाही. या अगोदर सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांना पाण्याच्या सदर्भात तक्रारी केल्या आहेत  पण यांची दखल घेत नाहीत. आज गावात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. पण ग्रामपंचायत याबाबत काहीच उपाय योजना करत नाहीत. गावपुढारी फक्त निवडणूकीच्या वेळी मतदान मागण्यांसाठी गरीब,व दलितांचे घरांचे उंबरठे झिझवतात बाकी साडेचार वर्षे सर्व सामान्य जनतेला वेठीस धरले जाते. दोन दिवसात पाणी पुरवठा सुरू नाही केला तर ग्रामपंचायत समोर महिलांना घेऊन अंदोलन करण्यात येईल असे गावातील सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे सर यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.