आष्टी । वार्ताहर

 गॅस वेल्डिंगचा व्यवसाय बंद ठेवत सर्वसामान्यांचा जीव वाचविण्यासाठी कड्यातील फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी आपल्याकडील ऑक्सिजन सिलेंडर कोविड सेंटरला देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.समाज्यामध्ये आणखी माणूसकी जीवंत आहे.
आष्टी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्यामुळे दवाखान्यात उपचार घेत असणार्‍या रुग्णांना बर्‍याचदा ऑक्सिजनची गरज भासत आहे. तालुक्यात एक शासकीय तर तीन खाजगी कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना अनेकदा ऑक्सिजनची गरज पडत आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन द्यायची गरज पडली तर तो द्यायचा कोठून हा प्रशासनासमोर मोठा पेच होता. मात्र सामाजिक दायित्वाची जाण डोळ्यासमोर ठेऊन  तालुक्यातील फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी एकत्रित येऊन रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. 


कडा येथील संतोष ओव्हाळ, जयंत देशमुख, अनिल पांडुळे, वासुदेव यादव, महेश सांगळे, चव्हाण, अंबिलवादे बंधूंसह इतरांनी सुमारे पंचवीस सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या सिलेंडरचा अनेक रुग्णांना फायदा होणार आहे.  तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या आवाहन प्रतिसाद देत अनिश्चित कालावधीसाठी त्यांनी आपापले सर्व सिलेंडर जमा केले. त्यांच्या सामाजिक कार्याला कडेकरांनी सलाम ठोकला आहे..सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या व्यापारी बांधवांचे सर्वस्तरातुन कौतुक होते आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.