कोरोनबाधीत रुग्णांना अन्नपुर्णा सेवेसाठी
पाटोदा व शिरुरलाही अन्नसेवा सुरु करणार
आष्टी । वार्ताहर
जगावर कोरोना महामारीचे संकट आलेले आहे. आता दुसरी लाट आली आहे.तिसरी लाट येणार असे म्हणतात कुणी घाबरुन जाऊ नये.हे ही दिवस जातील फक्त मनाने खचु नका खंबीर राहा.समाजातील सर्व क्षेत्रातील दानशुर लोक कोरोनबाधीत रुग्णांसाठी आपआपल्या परिने मदत करीत आहेत.
कोरोना महामारीत राजकीय नेते तर स्पर्धा लागल्यासारखी या रुग्णांना मदत करीत आहेत आणखी दानशुरांनी या कामासाठी पुढे येण्याची गरज आहे.मागील वर्षी कोरोनामुळे अनेक व्यावसायिक,शेतमजुर,सर्वसामान्य नागरिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.या कठीण परिस्थितीत भाजपचे जेष्ठ नेते माजी आ.भीमसेन धोंडे यांनी घरोघरी जाऊन किराणा माल ,मास्क सनेटायझर वाटप केले आहे.आष्टी विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर कोरोनबाधीत रुग्ण आढळून येत असल्याने माजी आ.भीमसेन धोंडे हे कोरोनबाधीत रुग्णांच्या मदतीला सरसावले आहेत.न्टीजन व आरटीपीसार तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयशेजारी असलेले बी.पीएड आणि बी.एड कालेजची ईमारत दिली. शिवाय प्रांगणात सावलीसाठी मंडप दिला आहे.आज सोमवारी या तपासणी केंद्रांला त्यांनी पदाधिका-यांसमवेत भेट दिली.कोविड सेंटरमध्ये जाऊन कोरोनबाधीत रुग्ण व नातेवाईकांना अन्नसेवेचे पकींग भोजन पाकीट वाटप केले.यावेळी माजी सभापती साहेबराव म्हस्के,ड.वाल्मिकतात्या निकाळजे,वैद्यकीय अधिक्षक डा.राहुल टेकाडे, भाजपा तालुकाध्यक्ष ड.हनुमंत थोरवे,विठ्ठलआण्णा बन्सोडे,अॅड.रत्नदीप निकाळजे,शंकर देशमुख,संदीप नागरगोजे,उत्तम बोडखे,बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.
माजी आ.भीमसेन धोंडे यांच्यावतीने आष्टी येथे कोरोनाबाधीत रुग्णांना अन्नपुर्णा सेवेचे आज प्रारंभ करण्यात आला.आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यातुन आष्टी येथे कोरोना अन्टीजन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी आलेल्या नागरीकांसाठी सावली (मंडप),पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या तपासणी सेंटरला माजी आ.भीमसेन धोंडे यांनी भेट दिली.माजी आ.धोंडे यांच्या हस्ते कोरोना रुग्णांना जेवणाचे पॅकेट देऊन अन्नसेवा सुरू करण्यात आली ते सातत्याने माणूसकीचा धर्म पाळत आहेत.कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले अनेकांच्या हाताचे काम गेले अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या परिस्थितीत आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमसेन धोंडे गोरगरीबांच्या मदतीला नेहमी धावून जात असतात. त्यांनी यापूर्वी घरोघरी जाऊन किराणा मालाचे धान्याचे वाटप करुन उपासमारीपासून वाचवले होते.आता पाटोदा आणि शिरुर येथे कोरोनबाधीत रुग्णांसाठी अन्नसेवा सुरु करणार असल्याचे माजी आ.भीमसेन धोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Leave a comment