तक्रार केली म्हणून धमकावल्याचा आरोप

बीड । वार्ताहर

जिल्हा रुग्णालयातील रेमडेसिवीर मर्जीतील खासगी हॉस्पिटलला पाठवून अफरातफर केली तसेच वॉर्डबॉय भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन चौकशीची मागणी करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यास धमकावल्याचा प्रकार घडला होता. चौकशीस टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी सोमवारी (दि.26) दुपारी अडीच वाजता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या दालनासमोर विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.


गत चार दिवसांपूर्वी दीपक थोरात यांनी जिल्हा रूग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अफरातफर झाल्याचा आरोप करत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर 21 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता डॉ.आंबेडकर भवनसमोर त्यांना तक्रार का करतो म्हणून दोघांनी धमकावले. या प्रकरणी थोरात यांनी शिवाजीनगर पोलिसांत त्या दोघांविरुध्द तक्रार दिली होती. दरम्यान, रेमडेसिवीर अफरातफर व वॉर्ड बॉय भरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करुन कारवाई करावी, अन्यथा 26 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दीपक थोरात यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी दुपारी अडीच वाजता ते विषारी द्रवाची बाटली घेऊन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या दालनात शिरले. त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, शहर पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. त्यांना स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शहर ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.

याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड म्हणाले, या तक्रारीबाबत माहीत नाही. मात्र, त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन वितरण तसेच वॉर्ड बॉय भरतीसंदर्भात केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही.तर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकते दीपक थोरात म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारच करु नये यासाठी धमकावण्यात आले. मात्र, धमक्यांना भीक न घालता मी तक्रार दिली. मात्र, प्रशासनाने दोषींची चौकशी करुन कारवाई करण्याऐवजी आत्मदहनाचा इशारा दिल्याने माझ्याचा अटकेसाठी प्रयत्न केले. या प्रकरणात माझ्यावर अजूनही दबाव आहे. गुंडांकरवी अधिकारी मला व कुटुंबाला धमकावत आहेत. मात्र, मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.