जिल्हाधिकारी साहेब कोरोना व्हॅक्शीन कर्मचाऱ्यांच्या ओळखीच्यांनाचं आहे का ?
धोंडराई लशीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या वशील्याने लशीकरण...
धोंडराई | वार्ताहर
कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासन व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत.यातच सर्वसामान्यांचे लसीकरण व्हावे यासाठी व्हॅक्शीन उपलब्ध करून त्यासाठी सर्कलच्या गावांमध्ये लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. अशीच लसीकरण केंद्राची व्यवस्था सोमवार रोजी तालुक्यातील धोंडराई येथे करण्यात आली होती धोंडराई हे जनगणेनुसार आठ हजार लोकसंख्येचे गाव असुन सर्कल मध्ये बऱ्याच गावांचा समावेश आहे या लसीकरण केंद्रावर फक्त दोनशे व्हॅक्शीन उपलब्ध झालेल्या आहेत मात्र ते डोसेस या केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ अभिमान केंद्रे यांच्या ढिसाळ नियोजनामुळे वशिल्याने देण्यात आल्या आहेत सामान्य माणूस लस घेण्यासाठी गेला तर आॅनलाइन बंद झाले , दोनशे डोस होते तेवढी नोंदणी झाली असे सांगितले जात होते . व नंतर धोंडराई केंद्रावर असणारे जाधव नामक शिक्षक यांच्या वशील्याने लसीकरणाची पावती तयार करून खिशात ठेवुन नंबरला न लागता दिली जात होती. तर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना त्या इसमाविषयी विचारले असता तो आमचा कर्मचारी नसल्याचे सांगितले जात होते जर तो जाधव नामक इसम कर्मचारी नव्हता तर तो केंद्रावर काय करत होता , आॅनलाइन बंद करा असे सांगण्याचा त्यांना अधिकार काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कलेक्टर साहेब सिएचओ केंद्रेंना कोरोना नियम शिकवा
धोंडराई उपकेंद्राचे सिएचओ अभिमान केंद्रे यांना लसीकरण केंद्रावर कोरोनाचा विसर पडलेला दिसुन आला यावेळी लोकांऐवजी कर्मचाऱ्यांनीच सीएचओ केंद्रेंना घोळका घालत सोशल डिस्टंटिंगचा फज्जा उडवला लोकांनी काही विचारले तर त्याचे निरासण करायचे सोडून माझी तब्येत ठीक नाही तरीपण मी येथे आलोय असेच सीएचओ केंद्रेंकडुन सांगण्यात येत होते व लसीकरण केंद्रावरील नियोजन करण्यात ते झिरो ठरले .अशा कर्मचाऱ्यांच्या कामामुळे कोरोना खरंच हद्दपार होईल का त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब अशा लोकांना आधि आवर घालत कोरोना नियम शिकवा!
Leave a comment