बीड । वार्ताहर

बीड शहरात ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांच्या संमतीने रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळा बाजार सुरू आहे. याबाबत आम्ही आपल्याकडे तक्रार दाखल केली होती. ज्या दिवशी तक्रार दाखल केली त्याच दिवशी संध्याकाळी ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांच्या संगनमताने लाइफलाइन मेडिको येथून रुग्णाच्या नातेवाईकांना 5400 रुपयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन विक्री होत असल्याची तक्रार बीड शहर ठाण्यात दाखल झाली. डोईफोडे नावाचा अधिकारी एवढा खुलेआम काळाबाजार करत असेल व आपले प्रशासन गप्प बसणार असेल तर सर्वसामान्य रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. जनतेचा रोष टाळायचा असेल तर रेमडेसिविर इंजेक्शन्स वाटपाच्या कामी ड्रग इंस्पेक्टर डोईफोडेऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गटनेते फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी केली आहे.

 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी आपण पुन्हा डोईफोडे नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. यावर कहर म्हणजे इंजेक्शन वाटपाचे कामही या डोईफोडे महाशयांनी त्याच लाईफलाईन मेडिको दुकानातून सुरू केले. इंजेक्शन वाटप तर सोडून द्या साधे कागदपत्रे देण्यासाठी हा अधिकारी सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध होत नाही. त्यांना फोन केला असता त्याचा मोबाईलही बंद असतो. हा सगळा प्रकार क्लेशदायक आहे. आपण प्रशासनाचे प्रमुख आहात. एवढ्या महामारीच्या व संवेदनशील काळात डोईफोडे सारखे निगरगट्ट अधिकारी सर्वसामान्य जिवांशी खेळत असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात जनक्षोभ तयार होऊन एखादी दुर्दैवी घटना घडेल व यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल. डोईफोडे व त्यांनी ठरवून दिलेले मेडिकलचे दुकान यांची मिलीभगत असल्यामुळे यापूर्वी लाईफ लाईन मेडिको सह ज्या मेडीकल दुकानांमधून रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करण्यात येत होती ती सर्व दुकाने टाळून दुसऱ्या दुकानांमधून व डोईफोडे ऐवजी दुसरा अधिकारी नेमून इंजेक्शनची विक्री करावी म्हणजे साठेबाजीला व काळाबाजाराला आळा बसेल असेही   फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.

 

 तर लोकं मरतील

 

जिल्हाधिकारी साहेब, आपण तळमळीने काम करत आहात पण आपल्या खालच्या अधिकाऱ्यांवर आपला वचक नसेल व तो राजरोस काळाबाजार करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवांशी खेळत असेल तर आपला चांगुलपणा शहराच्या काय कामाचा? असाच प्रकार सोमवारी रात्री एका राजकीय व्यक्तीच्या बालिशपणामुळे खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित करण्याबाबत झाला होता. खाजगी रुग्णालयांना सोमवारी रात्री व मंगळवारच्या पहाटे आपण ऑक्सीजन सिलेंडर वेळेवर उपलब्ध करून दिले नसते तर शंभरच्यावर रुग्णांचा मृत्यू बीड शहरामध्ये झाले असते. नशीब बलवत्तर म्हणून ही भयंकर दुर्घटना टळली. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन्स व ऑक्सिजन पुरवठ्यावर जिल्हाधिकारी म्हणून आपला वचक रहावा व यात पारदर्शकता यावी असेही पटेल व  नाईकवाडे यांनी म्हटले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.