रेमडेसिवीरचा तुटवडा रुग्णांची परिस्थिती गंभीर

आष्टी । वार्ताहर

राज्यात रेमिडिसीव्हर औषधाचा प्रचंड तुटवडा आहे, तीच परिस्थिती बीड जिल्ह्यात देखील आहे. राज्याचे आरोग्यमंत्री व मराठवाड्याचे विभागीय आयुक्त यांनी आम्हाला चार दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार दि.21 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात रेमिडिसीव्हर औषधाचा पुरवठा करण्यात येणार होता, परंत अद्याप बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत रेमिडिसीव्हर औषधाचा कोणताही पुरवठा जिल्ह्याला झालेला नाही. प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री वर्तमानपत्रात बातम्या देऊन मोकळे झालेत,मात्र रुग्णांची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. कोणत्याही परिस्थितीत रेमिडिसीव्हर औषधाचा पुरवठा करण्यात यावा. रेमिडिसीव्हर ईजेक्शन हे श्रीमंत काही पैसे देऊन घेऊ शकतात मग गरीबाने काय मरायचे की काय त्यांना जगण्याचा आधिकार नाही काय असा सवाल देखील आमदार धस  सारकारला केला आहे. यांनी आजचा दिवस उद्यावर ढकलू नये अशी प्रतिक्रिया आ. सुरेश धस यांनी केली आहे.

आ.धस पुढे बोलताना म्हणाले की,मराठवाड्यातील आरोग्यमंत्री आणि विभागीय आयुक्त यांच्या पुढाकाराने औषधाचे अधिकृत डीलर यांनी पैसे भरून ही रेमडीसीव्हरचा तुडवडा जाणवत आहे, चार दिवसापूर्वी आम्हाला सांगण्यात आले होते की,21 तारखेला मराठवाड्यात रेमडीसीव्हर उपलब्ध होतील. त्याप्रमाणे आम्ही रुग्णांच्या नातेवाइकांना पुढे सांगतोय,मात्र, आज रामनवमी दि.21 एप्रिल आहे अद्यापपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत देखील इंजेक्शन उपलब्ध झाले नव्हते.इंजेक्शन नेमकं कधी येणार आहे? शासकीय व जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेल्या खाजगी कोविड सेंटर मधील ज्या रुग्णाचा स्कोर जास्त आहे. अश्या रुग्णांना रेमडीसीव्हर इंजेक्शन तात्काळ देण्याची दखल घ्यावी,प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री वृत्तमानपत्राला बातमी देऊन मोकळं व्हायचं एवढंच काम करतात काय? नेमकं काय चाललंय?  विभागीय आयुक्त केंद्रेकरांना माझी विनंती आहे की , जोपण साठा उपलब्ध झाला असेल तो थोडाथोडा का होईना प्रत्येक जिल्हयात सर्वत्र पाठवला जावा,जेणेकरुन ज्या रुग्णांना आवश्यकता आहे अशांना रेमडीसीव्हर  देण्याची गरज आहे.त्या रुग्णांबाबत तात्काळ दखल घेऊन त्यांना रेमडीसीव्हर पुरवले जावेत अशी विनंती आ.सुरेश धस यांनी शेवटी बोलताना केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.