इतकी सुस्त यंञना मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही
आष्टी / प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थीतीवर राज्य सरकारच कुठल्याच यंञनेवर नियंञण नाही,कोणते विभाग काम करतय? कोणते विभाग झोपा काढतय हे पाहणे सरकारचे काम आहे.परंतू या यंञनेवर कुठल्याही प्रकारचे कंट्रोल राज्य सरकारचे राहिलेले दिसत नसल्याने राज्याची अवस्था बिकट होत चालली आहे.इतकी सुस्त यंञना मी माझ्या आयुष्यात मी पाहिली नाही,जनता अक्षरशः वा-यावर सोडलेली असून सरकारची अवस्था आयाराम गयाराम सारखी झालेली असल्याचे टिकास्ञ आ.सुरेश धस यांनी राज्य सरकारवर सोडले.
आ.धस यांनी त्यांच्या फेसबुक अकांउंट वरुन बोलताना राज्य सरकारची सद्यस्थिती गोंधळलेली असल्याचे सांगत काही खाजगी डाॕक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडिसीवरची मागणी केली जातेय.माञ रुग्णांना सरसकट रेमडिसीवर देण्याची आवश्यकता आहे का? हे तपासणे आवश्यक आहे.विनाकारण पैशावाले रूग्ण असले कि,सरसकट रेमडिसीवरची मागणी करायचा प्रकार काही ठिकाणी दिसत आहे.माञ अशावेळी ज्यांना खरच आवश्यकता आहे असे गोरगरीब रुग्ण यामध्ये होरपळले जात आहेत.ते इंजेक्शन मिळत नसल्याची आर्त किंकाळी नातेवाईकांची आम्हाला अनुभववायला मिळतेय.असे सांगत जामखेड येथील आरोळे रुग्णालयाच्या कोवीड सेंटर मध्ये अजूनही रेमडिसीवर वापरले गेले नाही.परंतु सरसकट रेमडिसीवर पाहिजे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली नाही पाहिजे.ज्या रुग्णाला खरोखरच आवश्यकता आहे अशा रुग्णांना रेमडिसीवर देणे गैर नाही.परंतु यासाठी रुग्णाचा नेमका किती स्कोर असल्यावर रेमडिसीवर दिले पाहिजे हे तपासले जाणे गरजेचे असल्याचेही आ.धस म्हणाले.
तर काही खाजगी दवाखान्यात अॕन्टीजन टेस्टचे किट दिसून येत आहेत.ते नेमके चोरी होतय का? विकले जातेत हे याचा तपास करणे गरजेचे आहे.कारण खाजगी दवाखान्यात अॕन्टीजन करुन पाॕझीटिव्ह आलेला रुग्ण चक्क घरी बसत आहेत तर काही रुग्ण गावातच फिरत असल्याचीही बाब समोर येत आहे.कारण त्या रुग्णांची सरकार दप्तरी नोंदच होत नसल्याने ते मुक्तपणे संचार करत आहेत.असेही आ.धस म्हणाले.
काही व्यक्ती 20/22 तास काम करताहेत हे मान्य असले तरी इतर यंञना झोपलेल्या अवस्थेत असल्याचे चिञ आहे.यामुळे या यंञनेवर कुणाचेच वचक नसल्याचे विदारक चिञ राज्यात दिसत आहे.
शिरुर कासार येथील डाॕ.ढाकणे यांनी आर्टीसुनेट 120 एमजी (Artesunate 120 mg IV) या इंजेक्शनचा वापर करुन काही प्रमाणात ते काम करत असल्याचा अनुभव घेतलेला आहे. हे मलेरियावर चालणारे इंजेक्शन देऊन रुग्ण बरे केले आहेत. डॉ.ढाकणे यांचा वैक्तीगत मत आहे .त्यांची किंमत साधारणतः तीनशे रुपये इतकी आहे.त्या डाॅक्टरांनी आणि कॅनडा,चीन इतर विदेशातील डाॅक्टरांनी मिळवून ह्यावर मलेरीयाचे सुध्दा इंजेक्शन चालत असल्याचे सांगितले आहे.याबाबत आपण माझ्या फेसबुक लाईव्हवरून डाॅ.ढाकणेंचा नंबर आहे त्यांना सुध्दा डाॅक्टर,रुग्ण,नातेवाईक यांनी संपर्क साधून माहिती घेऊ शकतात.
याचाही थोडा अभ्यास करुन ते इंजेक्शन किती प्रमाणात कोरोना रुग्णावर प्रभावशाली ठरतय याचा डाॕक्टर क्षेञातील मान्यवरांनी अभ्यास करुन या इंजेक्शनचा उपयोग होईल का हे पाहून ते इंजेक्शन काही प्रमाणात का होईना काम करत असेल तर ते पहावे असेही आ.धस म्हणाले.
कोरोनाग्रस्त रुग्ण बरे देखील होत आहेत हा सकारात्मक विचार ठेवा.आज समाजात कोरोनाची मोठी भिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोरोनाने माणसात माणूस ठेवला नाही.सगळ्याच्या चेहऱ्यावरचे हास्य हरवले असल्याचे दिसून येत आहे.माञ कोरोना झाला तरी बरा होतो हा सकारात्मक विचार डोक्यात ठेवण्याची आज गरज असल्याचेही आ.धस म्हणाले.
Leave a comment