आष्टी । वार्ताहर

गेल्या पंधरा दिवसांपासून आष्टी तालुक्याची कोरोनाबाधीतांची संख्या तीन अंकी होत आहेच परंतु पाटोदा व शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने या मतदार संघात रेमडेसीवर इंजेक्शन,वॅक्सीन पुरेशा प्रमाणात तर उपलब्ध करून द्यावीच पण येथे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाला मंजूरी देण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असल्याची माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केली.

आष्टी येथील पंडित जवाहर नेहरू विद्यालयाच्या कार्यालयात आज रविवार दि.18 रोजी सांयकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत माजी आ.धोंडे बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,सध्या बीड जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा अकडा दररोज एक हजाराच्या पुढे असून,आष्टी तालुक्यातही तीन अंकी कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.ब-याच कोरोना रूग्णांना उपचारासाठी बेड शिल्लक मिळत नाहीत.आणि मिळाले तर ऑक्सीजन अभावी त्यांना आपले प्राण गमवावा लागत आहे.सध्या कोरोनाची भयान परिस्थिती निर्माण झाल्याने आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यात प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर रेमडेसीवीर इंजेक्शन आणि लसही जास्त उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.तसेच आष्टी हे बीड जिल्ह्यापासून शंभर कि.मी. तर अंबाजोगाई पासून दिडशे कि.मी आहे.त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील कोरोनाबाधितांना उपचारा घेऊन जाईपर्यंत त्यांना जीव गमवावा लागतो.याचा विचार करून जसा अंबाजोगाई येथे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाला मंजूरी दिली आहे.तशीच मंजूरी आष्टी तालुक्यात द्यावी अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे,उपमुख्यमंञी अजित पवार,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंञी धनंजय मुंडे,माजी पालकमंञी पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे आपण निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचेही माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केली. तसेच सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनारूग्ण वाढत असून,कोरोनाबाधितांना उपचार घेण्यासाठी बेड कमी पडत आहेत. परंतु जर उपचारासाठी बेड कमी पडत असेल तर आपण आनंद चॅरीटेबलच्या वतीने दोनशे बेडचे जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली तर चालविणार असल्याचेही माजी आ.भीमसेन धोंडे यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.