आष्टी । वार्ताहर
आष्टी शहराला रेमडिसीवरची आवश्यकता आहे अण्णा तुम्हीच काय ते करु शकता असे आष्टी येथील कोवीड सेंटर चालविणा-या डॉक्टरांनी शुक्रवारी सायंकाळी 6 वा.विनंती केली आणि तात्काळ सुञ हलवित आ.सुरेश धस यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करत शनिवारी पहाटे 100 रेमडिसीवरची व्यवस्था केली.धसांची तळमळ पाहून शुक्रवारची संपूर्ण राञ आ.धस यांच्यासह प्रशासनातील अधिका-यांनीही जागून काढली आणि रेमडिसीवर मिळविले.
आष्टी तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे या ठिकाणी सरकारी बरोबरच खाजगी कोवीड सेंटर सुविधा सुरु झालेल्या आहेत.माञ या सर्व प्रक्रियेमध्ये आ.सुरेश धस यांचे आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव हा या कोवीड सेंटर चालविणा-या डाक्टरांसाठी तसेच प्रशासनातील अधिका-यांसाठी मोठ्या प्रमाणावर फासद्याचा दिसून येत आहे.शुक्रवारी आष्टी तालुक्यासाठी रेमडिसीवरची आवश्यकता असल्याचे आ.धस यांना समजल्यानंतर आ.धस यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधत रेमडिसीवर देण्याची विनंती केली.तात्काळ क्षणाचाही विलंब न करता केंद्रेकर यांनी आष्टीचे भूमिपुञ सध्या औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुनील चव्हाण यांना रेमडिसीवर आ.धस यांना देण्याचे सांगितल्यानंतर सुनील चव्हाण यांनी देखील त्याची अंमलबजावणी करत आ.धस यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधत रेमडिसीवर देतोय असे सांगितले.शुक्रवारी मध्यराञी साडेबारा वाजता आ.धस यांनी आष्टीचे तहसिलदार राजाभाऊ कदम आणि ता.आरोग्य अधिकारी यांना विभागीय आयुक्त आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना विनंती पञ व्यवहार अर्जट पाठवण्याचे सांगताच या दोन्ही अधिका-यांनी देखील समयसुचकता
दाखवून पञ व्यवहार केला.माञ हे रेमडिसीवर औरंगाबाद येथून जाणे-आणने यात वेळ जाईल हे लक्षात येताच आ.धस यांनी त्यांचे औरंगाबादचे उद्योजक मिञ शांताराम गाडेकर यांना रेमडिसीवर घेऊन येण्याची विनंती केली.या प्रक्रिये दरम्यान राञीचे तीन वाजले होते.गाडेकर यांनी देखील वेळ न दवडता औरंगाबाद घाटी रुग्णालयाचे गुणवंत यांच्याकडून रेमडिसीवर ताब्यात घेत पहाटे साडेपाच वाजता आष्टीत दाखल झाले.आणि आष्टी तालुक्याला शनिवारी पहाटेच हे रेमडिसीवर घेऊन आ.धस आष्टी ग्रामीण रुग्णालयात गेले.त्यांनी तहसिलदार राजाभाऊ कदम यांच्यासह आरोग्य अधिकारी डा.राहूल टेकाडे यांचेकडे हे रेमडिसीवर इंजेक्शन पोहोच केले.माञ या सर्व प्रक्रियेत संपूर्ण राञ गेली परंतु आ.सुरेश धस यांची तळमळ आणि कामाची धडपड पाहून प्रशासनातील अधिकारी देखील राञभर जागे राहिले.त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात कसे काम केले पाहिजे यासाठी आ.धस यांच्या अनुभवाची गरज असल्याचे यावेळी प्रत्यक्ष दर्शीनी बोलून दाखविले.
आ.धस यांची आरोग्यमंञ्याशी चर्चा
सद्यस्थितीत आष्टीसह मतदारसंघातील रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता.गंभीर रुग्णांकरीता रेमडिसीवरची कमतरता जाणवू नये म्हणून आ.सुरेश धस यांनी आरोग्यमंञी राजेश टोपे यांचेशी दुरध्वनीवरुन संवाद साधला यावेळी आपणांस रेमडिसीवरची कमतरता जाणवू देणार नाही असे आश्वासन आरोग्यमंञी टोपे यांनी धस यांना दिले.
24 तास तत्पर आ.धस
सद्यस्थितीत कोणाची काहीही अडचण असते कोणाला बेड मिळत नाहीत,कोणाला रेमडिसीवर मिळत नाही,कोणाची आर्थिक परिस्थीती नसल्याने उपचार करण्याला विलंब होत आहे अशा परिस्थीतीत आ.सुरेश धस यांनी माझा नंबर सर्वांकडे आहे.कुणाला कुठेही अशी अडचण असल्यास मला कधीही निसंकोचपणे संपर्क करा अशा कठीन परिस्थीतीत मी 24 तास उपलब्ध असल्याचे आ.धस यांनी सांगितले.
Leave a comment