लाभार्थ्यांचे 41 लाख परत गेले
गेवराई । अय्युब बागवान
गरिब विधवा महिलांसाठी सरकार तालुक्यासाठी तहसिल स्तरावर सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत 20 हजार रुपयेपर्यंत घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे आर्थिक मदत करते, परंतु गेवराईचे तहसीलदार सचिन खाड़े यांच्या नकारात्मक विचारामुळे निराधारांसाठी आलेले 41 लाख परत गेले.असून खाडेंची खोडी निराधार विधवा महिलाचा आधार घेवून गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गेवराई तालुक्यातील निराधारा झालेल्या विधवा महिलां साठी सामाजिक अर्थ सहाय्य योजने अंतर्गत तहसील कार्यालयात गेल्या 6 महिन्यात 208 प्रकरण प्रलंबित आहेत तहसीलदार खाडे यांनी या योजनेत खोडा टाकुन विधवा महिलांना त्यांच्या हक्का पासून दूर ठेवल्याचे उघड झाले आहे. गरिबांचे काम न करण्याची मानसिकता तहसीलदार खाड़े यांची असल्याने त्यांच्याविरुद्ध निराधारा महिला आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.
श्रावणबाळ,इंदीरागांधी योजने अंतर्गत अनेक निराधार लोकांचे प्रकरण मंजूरी अभावी धुळखात पडून आहेत. या प्रकरणाकडे 6 महिन्यापूर्वी आलेले तहसीलदार खाडे यांनी ही दुर्लक्षच केले आहे. ते आल्यापासुन तर यात अधिक भर पढली आहे ,तालुक्यातील विधवा महिलासाठी सुरु असलेल्या सामाजिक अर्थसहाय्य योजना गुडाळून ठेवण्याचे काम तहसील मध्ये सुरु आहे. तहसीलदार सचिन खाड़े रुजू झाल्यापासुन 6 महिन्यात सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून मिळणार्या 20 हजार रूपायाना ही विधवा महिला मुकल्या असून तब्बल 208 प्रकरण तहसील कार्यालयात पडून आहेत.पतीच्या मृत्यूनंतर एक आधार म्हणून सामाजिक अर्थ सहाय्य योजनेतून विधवा महिलांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावे महणून जिल्हा प्रशासनाने 41 लाख रूपयांचा निधी गेवराई तहसील कार्याल्यात पाठविले होते त्या पैशाचे बिल ही कर्मचार्याने तयार केले होते परंतु तहसीलदार खाड़े यांना ते देवू वाटले नाही म्हणून ते पैसे 31 मार्चला परत गेले. तहसीलदार सचिन खाडे हे लहरी मानले जातात. कार्यालयात भेटीसाठी येणार्या नागरिकांना त्यांनी बसन्यासाठी एक खुर्ची ठेवली नाही अधिकारी, पदाधिकारी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते चांगली वागणूक देत नाहीत,नीट बोलत नाहीत, मनमानी कारभार करतात असे अनेक आरोप त्यांच्यावर केले जात असून आता विधवा महिलांच्या योजनेत ही त्यांनी करंटेपणा दाखवला असल्याने आता त्यांच्याविरुद्ध लवकरच आंदोलन छेदन्याचा इशारा आमदार सहित अनेक कार्यकर्त्यांनी लोकप्रश्नशी बोलतांना दिला आहे.
Leave a comment