रेमडेसिवीरची  जादा दराने विक्री

बीड । वार्ताहर

शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा अधिक पैसे उकळून रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री केल्याचा प्रकार शहरात गुरुवारी (दि.15) रात्री नऊ वाजता उघडकीस आला.या प्रकरणी लाईफलाईनच्या मेडिकल विरोधात संतोष सोहनी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान पोलीसांनी हे प्रकरण चौकशीवर ठेवले आहे. हा प्रकार समजताच शहर पोलीस ठाण्यात एकच गर्दी झाली. जिल्हाधिकार्‍यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे.

शहरातील बसस्थानकासमोरील सागर हाईटमध्ये लाईफलाईन रुग्णालयाच्या औषधी दुकानात हा प्रकार घडला. यामुळे रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांचे नातेवाईक बीडमधील संजीवनी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी डॉक्टरांनी संतोष सोहनी यांना त्यांच्या नातेवाईक रुग्णांसाठी रेमडेसिवीरचे दोन इंजेक्शन आणण्यास सांगितले.त्यानंतर सोहनी यांनी औषध निरीक्षक डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला असता, शहरातील लाईफलाईन हॉस्पीटल नजिकच्या मेडिकलमध्ये इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. नंतर सोहनी रुग्णालयाच्या औषधी दुकानात गेले तेव्हा एमआरपीनुसार दोन इंजेक्शनचे प्रत्येकी 5 हजार 400 रुपयांप्रमाणे विक्रेत्याने 10 हजार 800 रुपये बिल आकारले. प्रत्यक्षात शासनाने रेमडेसिवीरला 1400 रुपयांची मर्यादा घालून दिलेली आहे. मूळ किमतीपेक्षा सहा हजार 400 रुपये अधिक घेतल्याने संतोष सोहनी यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या कानावर घातला. दरम्यान नंतर काही वेळाने शहर पोलीसांनी घटनास्थळी दाखल घेत मेडिकल चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर संतोष सोहनी यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असे सहायक निरीक्षक मुस्ताफा शेख व उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.