अंबाजोगाई,बीड, परळी,केजमध्ये विक्रमी वाढ
बीड । वार्ताहर
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची तयारी केली जात असली तरी जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. मंगळवारी (दि.13) जिल्ह्यात 1 हजार 18 नवे रुग्ण निष्पन्न झाले.
कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूसंख्याही वेगाने वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 4 हजार 183 जणांची चाचणी केली गेली त्याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यात 3 हजार 165 जण निगेटिव्ह आले तर 1 हजार 18 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 243, बीड 216, परळी 140,केज 119, आष्टी 98, धारुर 28, गेवराई 50, माजलगाव 34, पाटोदा 56, शिरुरमध्ये 20 तर वडवणी तालुक्यात 14 रुग्णांचा समावेश आहे.अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी दिली.
Leave a comment