बीड । वार्ताहर
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सन 2020-21 ( 31 मार्च 2021 ) चा वार्षिक हिशोब झाला असून बँकेच्या ठेवी रु .442 कोटी 18 लाख आहेत. तसेच बँकेचे एकूण कर्जे रु .1049 कोटी 86 लाख इतके आहे . तसेच बँकेचा ढोबळ नफा रु .21 कोटी 58 लाख इतका कोटी झाला असून बँक सातत्याने मागील पाच वर्षात नफयात असून बँक चौफेर प्रगती करत असल्याची माहिती बँकेचे सन्माननिय अध्यक्ष आदित्य सारडा यांनी यावेळी दिली.
त्यांनी सांगितले की,दि.31 मार्च 2021 अखेर बँकेचे भाग भांडवल रु .65 कोटी 75 लाख असून बँकेचा राखीव निधी रु .469 कोटी 32 लाख इतका आहे . बँकेचा बुडीत संशयीत निधी रु .458 कोटी 75 लाख इतका आहे . यावर्षी बँकेने रु .245 कोटी 96 लाख इतकी तरतूद केली आहे . बँकेला कर्जमाफी मधुन मुद्दल रु . 267 कोटी 18 लाख व व्याज रु .98 कोटी 03 लाख एवढी रक्कम प्राप्त झाली आहे . बँकेला झालेल्या नफयामुळे बँकेने मोठया प्रमाणात तरतूदी केल्या आहेत.
गतवर्षी बँकेने राज्य सहकारी बँकेकडून कर्ज उचल केली नव्हती . बँकेने यावर्षी रु .189 कोटी 88 लाख जिल्हयांतील शेतकर्यांना शेतीकर्ज वाटप केल्यामुळे राज्य बँकेकडून रु .88 कोटी 13 लाख इतके फेरकर्ज घेतले आहे . बँकेने सहकारी पत संस्थांना कर्ज वाटप केले असून त्यावर फेरकर्ज घेतलेले नाही. चालू वर्षी शेतकर्यांना बँकेने एटीएमद्वारे पीक कर्ज वाटप केले असून आजही सदरील योजना चालू आहे. पंकजाताई मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली बँकेने मागील वर्षी चांगले काम केले असून जिल्हयांतील सर्व लोकप्रतिनिधींनी बँक सुरळीत चालावी म्हणून बँकेचे संचालक व कर्मचार्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले . त्यामुळे बँकेने पून्हा उभारी घेतली आहे. बँक सुरळीत चालविण्यासाठी जिल्हयांतील सर्व नेते मंडळी , सहकारातील जाणते मंडळी , कार्यकर्ते , सभासद , ठेवीदार यांनी बँकेस योग्य मार्गदर्शन केल्यास बँक निश्चितच मराठवाडयात क्रमांक एकवर येईल असे प्रतिपादन बँकेवे अध्यक्ष आदित्यही सारडा यांनी यावेळी केले. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष गोरखजी धुमाळ, संचालक महादेव तोंडे , संचालक फुलचंद मुंडे , संचालक वसंतराव सानप,. नितीन ढाकणे, व हिंदुलाल काकडे उपस्थित होते . तसेच बँकेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.सी.ठोंबरे , उपव्यवस्थापक आर.व्ही.उबाळे, एस.पी.राठोड, के.यु.आघाव ,डी.व्ही.कुलकर्णी हे उपस्थित होते.
Leave a comment