बीड । वार्ताहर
जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधित रुग्णांमुळे उपचारासाठी बेड ही मिळेनात अशी स्थिती निर्माण झालेली असतांनाच कोरोना संक्रमण थांबेनासे झाले आहे. आज गुरुवारी (दि.1) जिल्ह्यात तब्बल 393 बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे. मागील चार महिन्यातील एकाच दिवसातील ही सर्वोच्च रुग्ण संख्या आहे. एकीकडे संपुर्ण जिल्हा लॉकडाऊन असतांनाही बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे.
बुधवारी जिल्ह्यात 2 हजार 956 जणांची कोरोना चाचणी केली गेली. त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यामध्ये 393 नवे रुग्ण आढळून आले तर 2 हजार 563 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 127, अंबाजोगाई 65, आष्टी तालुक्यातील 45, धारुर तालुक्यातील 4, गेवराई तालुक्यातील 11, केज तालुक्यातील 33, माजलगाव तालुक्यातील 34, परळी तालुक्यातील 34, पाटोदा तालुक्याातील 26, शिरुर तालुक्यातील 5 तर वडवणी तालुक्यातील 9 जणांचा समावेश आहे. दरम्यान,बुधवारी 9 जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 897 इतकी झाली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 23 हजार 129 इतकी आहे 635 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
कोरोना लस घेतल्यानंतर अर्धा तास केंद्रावरच थांबणं गरजेचं, अन्यथा गंभीर परिणाम
आजपासून देशभरात लसीकरणाचं महाभियान सुरू झालं आहे. आज एक एप्रिलपासून देशात 45 वर्षावरील सर्व नागरिक लसीकरण केंद्रावर लस (Covid-19 Vaccine) घेऊ शकतात. इतकंच नाही तर आता कोणालाही कोणत्याही आजाराचं प्रमाणपत्रही दाखवावं लागणार नाही. केवळ आधार कार्ड किंवा मतदान कार्डसारखं ) ओळखपत्र दाखवावं लागेल.
कोरोना लसीकरण केंद्रावर लोकांमध्ये केवळ लसीबद्दल जागरुकता केली जात नाही तर लसीकरणादरम्यान घ्यावयाच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केलं जात आहे. लोकांना असंही सांगितलं जात आहे, की लस घेतल्यानंतर २५ ते ३० मिनीट केंद्रावरच थांबण गरजेचं आहे. लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा सल्ला दिला जात आहे.
डॉ. अरोडा म्हणाले, की लसीकरणानंतर अधिक वय असणाऱ्या लोकांना अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे लसीकरणानंतर लोकांनी अर्धा तास केंद्रावरच थांबावं असं सल्ला दिला जात आहे, कारण त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. लसीकरणानंतर अॅलर्जीचं काही लक्षण दिसल्यास किंवा व्यक्तीची तब्येत बिघडल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करणं शक्य होईल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीकरणानंतरच्या रिअॅक्शनचं दोन गटात विभाजन केलं गेलं आहे. यात हलके आणि गंभीर असे दोन प्रकार आहेत. लसीकरणानंतर त्याजागेवर सूज, दुखणं किंवा लाल पडणं ही लक्षण साधारण आहेत. यात ताप येणं, डोकेदुखी, भूक न लागणं आणि अंगदुखी यांचाही समावेश आहे. यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर अधिक परिणाम होत नाही आणि ते लवकरच ठीक होतात. गंभीर लक्षणांबद्दल बोलायचं झाल्यास, यात जीव गमवण्याचा धोका अधिक असतो. यात लस घेताच त्याची अॅलर्जिक रिअॅक्शन होते. लसीला शरीर प्रतिसाद देत नाही आणि त्यामुळे अशा घटना घडतात. म्हणूनच लस घेतल्यानंतर अर्धा तास केंद्रावरच बसून राहाणं गरजेचं असतं.
कोरोनाचा रडारवर लहान मुले! ५५ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार पार गेली आहे. त्यात आता राज्यातील पालकांची चिंता वाढणारी बाब समोर आली आहे. कोरोनाच्या रडावर लहान मुले असून मार्च महिन्यांत ५५ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. १० वर्षांपर्यंतच्या १५ हजार ५०० तर १० ते २० वयोगटातील ४० हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून ती पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्रभावी आहे. यामध्ये लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. जानेवारीत १० वर्षांच्या खालील मुलांना कोरोनाचा होणाऱ्या मुलांचे प्रमाणे २००० हजार होते. फेब्रुवारीत २७०० होते. मात्र मार्च महिन्यात थेट १५ हजारांचा टप्पा गाठला आहे.
Leave a comment