बीड | वार्ताहर
जिल्ह्यात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली असून सकाळी 7 ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकानं, रेस्टॉरंट, बार,हॉटेल,खानावळ यांना पार्सल साठी सूट दिली आहे,तसेच सर्व पेट्रोल पंप यांना देखील या वेळेत सूट दिल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेशानुसार दिली आहे .
बीड जिल्ह्यात वाढते कोरोना रुग्ण लक्ष्यात घेता जिल्हाधिकारी जगताप यांनी 26 ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉक डाऊन जाहीर केला होता,मात्र याला व्यापारी आणि राजकारणी लोकांनी विरोध केला होता .यावेळी 30 पासूनकाही प्रमाणात शिथिल करण्याचे आश्वासन प्रशंसनाने दिले होते .
त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी जगताप यांनी नवे आदेश काढत किराणा दुकाने तसेच बार,रेस्टॉरंट, खानावळ,हॉटेल यांना सकाळी 7 ते दुपारी एक वाजेपर्यंत सूट दिली आहे .
Leave a comment