वडगावढोक येथील शेतकर्याचे गेवराईत धरणे
गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील वडगाव ढोक येथील शेतात जाण्या येण्यासाठी शिव रस्ता वरील अतिक्रमण हटवुन खुला करण्यात यावा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देऊन तहसील कार्यालयात समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वडगाव ढोक येथील गट क्रमांक 215, 216, 219, 228 व 229 या शेतात जाण्या येण्यासाठी शिव रस्ता वरील अतिक्रमण हटवुन खुला करण्यात यावा यामुळे शेतकर्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही असे निवेदन देऊन तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या निवेदनावर प्रल्हाद बारगजे, सुनिल ढाकणे, धर्मा बारगजे व सखाराम ढाकणे यांची नावे आहेत.
Leave a comment