माजलगांव । वार्ताहर
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पाचे विस्तारीकरणांतर्गत बॉयलर सिव्हील कामाचे भुमीपूजन माजी मंत्री आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते बुधवारी (दि.17) सकाळी 11.30 वाजता संपन्न झाले.
यावेळी ते म्हणाले, केंद्र शासनाच्या धोरणानुसार साखर उद्योगाला येणार्या अडचणी सोडविणेसाठी तसेच साखर उद्योगातील ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊसाची बिले वेळेत मिळावेत यासाठी इथेनॉल ब्लेडींग पेट्रोल कार्यक्रमा अंतर्गत इथेनॉल उत्पादन वाढविणे ,ऑईल कंपन्याना इथेनॉल पुरवठा करुन कारखान्यांना वेळेत पैसा उपलब्ध व्हावा यासाठी इंटरेस्ट सब व्हेंशन योजना जाहिर केलेली आहे . या योजनेच्या सहाय्याने आपले कारखान्याने सध्याचे 45 के.एल.पी.डी. हुन 9 0 के.एल.पी.डी. प्रकल्प विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे . या प्रकल्पात आपण दररोज 1 लाख लिटर्स अल्कोहलचे उत्पादन घेणार आहोत . आसवणी प्रकल्प बारमाही चालणेसाठी इन्सीनरेशन बॉयलर,2.5 मेगावॅट विज निर्मीती तसेच वाया जाणारे पाण्यावर पुनश्च ट्रीटमेंट करणेसाठी सी.पी.यु. युनीट इ. तंत्रज्ञानाचा अवलंब असणार आहे .
साखर कारखान्यात दरवर्षी निसर्गाच्या अनियमीत लहरीमुळे साखर उत्पादन कमी जास्त होत असते त्याचा परिणाम साखर कारखान्याच्या आर्थीक स्थितीवर होऊन साखर कारखाने अडचणीत येतात . यास इथेनॉलचे उत्पादन वाढविणे व इतर बायप्रॉडक्ट निर्माण करणे हेच आर्थीकदृष्टया फायदेशीर ठरणार आहे . कारखान्यात परंपरागत सी हेवी मोलासेस पासुन इथेनॉल निर्मीती केली जात होती. परंतु केंद्र शासनाने सी हेवी मोलासेस बरोबर बी हेवी मोलासेस ऊसाचा रस,ऊसाचा पाक साखर इत्यादीपासुन इथेनॉल निर्मीती करणेस मान्यता दिल्याने यापुढे साखर निर्मीती कमी करुन इथेनॉलचे उत्पादन जास्तीत जास्त घेतलेस साखर कारखान्यांना त्याचा फायदा होणार आहे . कारखान्याने प्रकल्प विस्तारीकरणासाठी राज्य शासन , केंद्र शासन , मा.साखर आयुक्त , पुणे , महाराष्ट्र प्रदुषण मंडळ यांच्या आवश्यक त्या मान्यता घेतल्या असुन सदरील प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक , मुंबई यांचेकडुन कर्ज मंजुर झाले असुन आज आपण बॉयलरच्या सिव्हील कामाचे भुमीपूजन करुन प्रकल्पाचे विस्तारीकरण कामास सुरुवात केलेली आहे . डिस्टीलरी प्लँट व मशिनरी , इव्हॉपोरेशन , सी.पी.यु. तसेच विज निर्मीती ( टर्बाइन त्रिवेणी मेक ) चे काम प्राज इंडस्ट्रीज पुणे या नामाकिंत कंपनीस दिले असुन स्पेंट वॉश पासून स्टीम निर्मितीसाठी इन्सीनरेशन बॉयलरचे काम मे.थरमॅक्स या कंपनीस दिलेले आहे . डिस्टीलरीचे काम 7 ते 8 महिन्यात व बॉयलर,टर्बाइनचे काम 10 ते 11 महिन्यात अगदी वेळेत पुर्ण करणेचा मानस आहे.
पुढील वर्षीच्या अर्थात सिझन 2021-22 मध्ये माहे जानेवारी 2022 पासुन वाढीव इथेनॉल उत्पादनास सुरुवात होणार असुन दरवर्षी 4.5 ते 5.00 कोटी लिटर्स इथेनालचे उत्पादन होणार असुन त्यातुन रुपये 300.00 कोटीचा टर्न ओव्हर अपेक्षीत आहे.त्यामुळे सिझन 2021-22 मध्ये कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊस बिले वेळेत देणे शक्य होणार आहे . पुढील काळात कारखान ासी.एन.जी व फुड ग्रेडचे कार्बन डाय ऑक्साईड हेही प्रकल्प सुरु करणार आहे.त्यामुळे कारखान्याची आर्थीक स्थिती मजबुत होणेस खुप मोठा वाव असल्याचेही आ.प्रकाशदादा सोळंके म्हणाले.
Leave a comment