केज । वार्ताहर
थकबाकीदार शेतकर्यांच्या वीज तोडणी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना बंदी आदेश डावलून रस्त्यावर उतरली असून केज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्त्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वखाली केज येथील शिवाजी चौकात विज महामंडळा कडून थकबाकीदार शेतकर्यांची तोडली जाणारी वीज व सक्तीची वीज बिल वसुली याच्या विरोधात आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कुपदीप करपे, मीरा नाईकवाडे, सुनीता साखरे, लता सावंत, तारा घोडके यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment