किल्लेधारूर । वार्ताहार
धारूर शहरातुन जाणार्या खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे माजलगाव ते केज हे सात किलोमीटरचे काम हे दिलीप बिल्डकॉन या कंपनीने केले आहे हे काम प्रचंड निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाला जागोजागी भेगा पडल्याचे दिसून येत आहे व या भेगा मोठ्या मोठ्या असल्याने वाहनांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्यावर काम करताना एमएसआरडीचे अधिकारी व दिलीप बिटकान कंपनीचे कर्मचारी यांनी हे काम संगनमताने निकृष्ट दर्जाचे केल्याने अनेक ठिकाणी हे काम विविध कामे अर्धवट ठेवल्याने या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहेत. या गुत्तेदाराने हे काम करताना अनेक कामे पोट गुत्तेदार नेमून त्यांचे मार्फत अटपून घेतले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून हे काम चांगल्या दर्जाचे करून घेतल्याशिवाय टोलनाका सुरू करू नये अशीही मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश फावडे यांनी केली आहे.
Leave a comment