बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात बुधवारी (दि.17) आणखी दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी दिवसभरात 1903 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल आज गुरुवारी देण्यात आले. यामध्ये 1669 अहवाल निगेटिव्ह आले तर 234 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई 33, आष्टी 17, बीड 91, धारुर 15, केज 5, गेवराई 4, माजलगाव 20, परळी 25, पाटोदा 14, शिरुर 7, वडवणी 3 येथील रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या 21 हजार 458 एवढी झाली आहे. पैकी 19 हजार 469 कोरोनामुक्त झाले असून 597 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
Leave a comment