कलेक्टरांना घेराव घालणार - राजेश घोडे

 

 

माजलगाव  । वार्ताहर

 

कोविड सेंटरच्या नावाखाली माजलगाव येथील मागासवर्गीय शासकीय मुलींचे वस्तीगृह कोविड केअर सेंटरसाठी घेतले आहे. याठिकाणी असलेल्या मुलींना इतरत्र हलविण्यात आले असुन या मागासवर्गीय विद्यार्थी मुलींवर अन्याय केल्यास जिल्हाधिका-यांना घेराव घालणार असल्याचा इशारा मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी दिला आहे.  

शहरापासुन जवळच असलेल्या केसापुरी वसाहत येथे शासनाने मागासवर्गीय शासकीय मुलींचे भव्य असे वस्तीगृह उभारले आहे. याठिकाणी सर्व सुविधा, मुलींना सुरक्षितता आहे. सिसीटीव्ही कॅमेरे आहेत. वस्तीगृहास कंपाउंड वाल आहे परंतु गेल्या तिन दिवसांपासून कोविड सेंटरच्या नावाखाली याठिकाणी असलेल्या 11 मुलींना जवळच असलेल्या मुकबधिर निवासी विद्यालयात हलविण्यात आले आहे. याठिकाणी कसल्याही प्रकारच्या सुविधा नाही, सुरक्षितता नाही अशा ठिकाणी विद्यार्थी मुलींना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणासाठी आई - वडिलांना सोडुन आलेल्या या मुलींवर अन्याय होत असुन यातुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व त्यांच्या जिवीतावर देखिल बेतण्याची शक्यता आहे. मुलींची इच्छा नसतांना देखिल या वस्तीगृहातुन त्यांना कोविड सेंटर ताब्यात घेणा-यांनी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत बाहेर काढले आहे. हे वस्तीगृह मागासवर्गीय मुलींचे असल्यामुळेच त्यांना बाहेर काढण्याचे धाडस प्रशासनाने केले आहे. मुकबधिर निवासी विद्यालयाचे वातावरण तहसिलदार व समाजकल्याण अधिकारी यांना माहिती सांगुन देखिल संबंधित मुलींना मुकबधिर शाळेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्या मुलींना पूर्ववत वस्तीगृह द्यावे अन्यथा मानवी हक्क अभियानच्या वतीने कलेक्टरांना घेराव घालण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, रमेश गवळी, मधुकर कांबळे, महादेव कांबळे, बाबासाहेब मुजमुले, विष्णू मुजमुले, महादेव उमाप, परमेश्वर आडागळे यांनी दिला आहे. दरम्यान हे वस्तीगृह पूर्ववत मुलींना न दिल्यास जिल्ह्यात मानवी हक्क अभियानाच्या मोर्चा काढण्याचा इशारा देखिल देण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.