धोंडराई | वार्ताहर
गेवराई तालुक्यातील गोदापात्रातुन अवैध वाळू चा उपसा चालु असुन त्यावर अनेक कारवाया झालेल्या आहेत अशीच एक कारवाई शुक्रवार दिनांक १२ रोजी तालुक्यातील सावरगाव येथे एसपीच्या पथकाने केली.

या विषयीची अधीक माहिती अशी की , सावरगाव येथील गोदापात्रातुन अवैध वाळू उपसा केला जात होता याची माहिती मिळताच एसपी पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांनी त्यांच्या टीमसह गोदापात्रात छापा मारला असता अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टर वर त्यांनी कारवाई केली आहे.कारवाई केलेले सर्व

ट्रॅक्टर गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत.वाळु उपसा करणाऱ्यांवर महसूल सह पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलेले दिसुन येत आहे शुक्रवार रोजी सकाळी तहसील पथकाने बागपिंपळगाव नजीक वाळुच्या ट्रक वर कारवाई करुन ट्रक ताब्यात घेतली तर त्याच दिवशी नऊ वाजेच्या दरम्यान विलास हजारेंनी सावरगावात आठ ट्रॅक्टर वर कारवाई केली आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment