जिल्ह्यात आज तब्बल 185 बाधित
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर चालली आहे. चार महिन्यानंतर आज गुरुवारी (दि.11) जिल्ह्यात तब्बल 185 कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे. बर्याच कालावधीनंतर बाधितांचा आकडा वेगाने वाढल्याने जिल्हाभरात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी आतातरी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात गुरुवारी 1407 संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या यात 1222 जणांची अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर 185 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये सर्वाधिक 85 रुग्ण बीड तालुक्यात निष्पन्न झाले आहेत. या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 42, आष्टी 16, माजलगाव 13, गेवराई 12, केज 7, परळी 5, वडवणी 3 तसेच शिरुर व धारुर तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी ही माहिती दिली.
Leave a comment