बीड । वार्ताहर
कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागु करण्याची प्रक्रिया सुरु केली गेली आहे. असे असले तरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडेवारी पुन्हा एकदा शतकपार झाली आहे. बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 110 नवे रुग्ण निष्पन्न झाले.या रुग्णांवर कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.
बुधवारी जिल्ह्यातील 1063 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली.पैकी 953 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 110 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये सर्वाधिक 57 रुग्ण बीड तालुक्यात निष्पन्न झाले असुन या पाठोपाठ माजलगाव तालुक्यात 13, आष्टी 11, अंबाजोगाई 10, गेवराई 5, केज, परळी तालुक्यात प्रत्येकी 4, पाटोदा व वडवणी तालुक्यात प्रत्येकी 2 तसेच शिरुर व धारुर तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहेे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment