स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने मुळव्याध हा आजार गर्भधारणेच्या काळामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पोटातील प्रेशर वाढल्यामुळे मलाशयावर दाब येतो व पोय साफ होण्यास त्रास होतो. गर्भधारणेमध्ये व नंतर मुळव्याधीचा फिशर हा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो. गर्भधारणेच्या काळात गर्भाच्या योग्य वाढीकरीता आवश्यक औषधोपचार जसे की, जीवनसत्वे व लोहाच्या गोळ्या व इतर औषधी यांच्या सेवनामुळे मलबध्दता होते, आणि मलबध्दतेमुळे मुळव्याध उत्पन्न होतो. लक्षणांमध्ये शौचानंतर आग होणे किंवा वेदना होणे, रक्तस्त्राव थेंब-थेंब किंवा लागून येणे, सुज असणे, खाज येणे, पोट साफ न होणे, कुंथावे लागणे, अपचन, गॅसेस होणे, शौचाच्या ठिकाणी कोंब लागणे, शौच्याच्या ठिकाणी जखम होणे, गाठ लागणे इत्यादी लक्षणे आढळतात.

गर्भधारणेमध्ये मुळव्याध झाल्यास अथवा होऊ नये म्हणून पुढील काळजी घ्यावी.
* गर्भवती स्त्रीने डाव्या अंगावर झोपावे.
* पाणी अधिक प्यावे.
* भुक लागल्यावर जेवण करावे, भुक मारू नये.
* फळे व भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे.
* दररोज पायी फिरण्यासारखा व्यायाम करावा.
* सुज व वेदनेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने मलम लावावा.
* वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्यात बसावे.
* मलबध्दतेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पोट साफ होण्यासाठी औषध घ्यावे. गरज पडल्यास इनिमा घ्यावा.
* जेवणात दुध, तुपाचा वापर अधिक करावा.
* जेवणानंतर ताक प्यावे.
* जेवणानंतर लगेच झोपू नये.
* उपवास करू नये.
* मलबध्दता होणार नाही याची काळजी घ्यावी. जसे मैद्याचे पदार्थ टाळावेत तर तंतुमय पदार्थांचे सेवन अधिक करावे.
* शौचास कुंथू नये.
* रात्री लवकर झोपावे व सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे म्हणजे नैसर्गिकपणे पोट साफ होते.
* रोज रात्री झोपतांना एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तुप टाकून प्यावे.

=== ज्यांना मुळव्याधीचा त्रास आहे अशा गर्भवती स्त्रीने पुढील गोष्टी करू नये.==
* बाजरीची भाकरी खावू नये.
* अंडी, मटन, मासे खावू नये.
* तेलकट व मसालेदार पदार्थ खावू नये.
* तुर, हरबरा, वांगी, गवार खावू नये.
* शेवग्याची शेंग खावू नये.
* शाबुदाना, पोहे खावू नये.
* रात्री जागरण करू नये.
* चहा, कॉफी, कोल्ड्रींक्स टाळावे.

गर्भवती स्त्रीयांमध्ये मुळव्याधीची शस्त्रक्रिया करणे शक्य नसते. त्यामुळे ज्या स्त्रीयांना अगोदर पासूनच मुळव्याधीचा त्रास आहे. त्यांनी गर्भधारणा राहण्यापूर्वीच मुळव्याधीचा उपचार तज्ञ डॉक्टरांकडून करणे गरजेचे असते. अन्यथा पूर्ण नऊ महिने त्रास सहन करणे क्रमप्राप्त ठरते.

डॉ.सौ. उर्मिला घोडके
स्त्री मुळव्याध तज्ञ
घोडके हॉस्पिटल, बीड.

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.