प्रलंबित विकासकामेही तातडीने मार्गी लावणार-अमर नाईकवाडे 

बीड । वार्ताहर

 

शहरातील नगरपालिकेच्या प्रभाग 3 मधील विप्रनगर भागात मंगळवारी (दि.2) सिमेंट रस्ता व नाली कामाला सर्व ज्येष्ठांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून खोदलेल्या रस्त्यांमुळे प्रभागातील नागरिकांनी विनातक्रार प्रचंड त्रास सहन केला. सर्व अडचणींवर मात करत आता प्रभागातील रस्ता कामांना सुरुवात झालेली आहे अशी माहिती नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी दिली.

 


बीड शहरातील विप्रनगर भागातील सिंमेट रस्ता व नालीकाम सुरु झाल्याने नागरिकांनी नगरसेवक अमर नाईकवाडे यांचे आभार मानले. दरम्यान येणार्‍या महिनाभरात विप्रनगर भागातील सर्व रस्ते एकामागून एक करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. विप्रनगर सोबतच प्रभाग 3 मधील सर्व भागातील प्रलंबित कामांना एकामागोमाग सुरुवात करण्यात येणार आहे, याची प्रभागातील नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहनही याप्रसंगी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केले. मागील एक दशकापासून आपण विनातक्रार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात या बद्दल मी आपला ऋणी आहे. येणार्‍या महिना-दोन महिन्यात प्रलंबित कामे पूर्ण झाल्यानंतर विकास कामांच्या बाबतीत प्रभाग 3 शहरातील इतर प्रभागांच्या तुलनेत नक्कीच पुढे असेल असा विश्वासही अमर नाईकवाडे यांनी यावेळी व्यक्त केला. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.