सर्व दुकानदार, व्यापारी व व्यावसायिकांनी अँटिजेंन टेस्ट करावी
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व व्यापार्यांनी पुन्हा एकदा अॅन्टिजेन टेस्ट करुन घेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, बीड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनोद पिंगळे यांच्यासह जिल्हा व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष प्रमोद निनाळ, किराणा होलसेल असोसिएशनचे अध्यक्ष जवाहर कांकरिया यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या जास्त संपर्कात येणार्यासुपर स्प्रेंडर्सच्या अॅन्टिजेन टेस्टचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. त्या अनुषंगाने सर्व व्यापार्यांसोबत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व व्यापार्यांनी अॅन्टिजेन टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन संतोष सोहनी यांच्यासह विनोद पिंगळे, प्रमोद निनाळ, जवाहर कांकरिया यांनी केले आहे.
Leave a comment