बीड । वार्ताहर
जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. शनिवारी 77 नवे रुग्ण निष्पन्न झाले. यात गेवराई तालुक्यातील येवले वस्ती कोल्हेर येथे एका आश्रमात शुक्रवारी अॅन्टीजेन टेस्टमध्ये बाधित निष्पन्न झालेल्या 29 जणांचा समावेश आहे. तसेच 25 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सुदैवाने शनिवारी मृत्यूची नोंद झाली नाही.
शनिवारी जिल्ह्यात 779 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 702 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 15, आष्टी 6, बीड 11, गेवराई 5, केज 6 व माजलगाव तालुक्यातील 3 रुग्णाचा समावेश आहे. तसेच 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 18 हजार 740 इतकी झाली आहेत.तर 17 हजार 845 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 577 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
Leave a comment